Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यामुंबई बाँबस्फोटातील आरोपींनी कोट्यावधींची जमीन मलिकांना स्वस्तात का विकली ?

मुंबई बाँबस्फोटातील आरोपींनी कोट्यावधींची जमीन मलिकांना स्वस्तात का विकली ?

मुंबई | Mumbai

महाराष्ट्रात मागील महिनाभर एनसीबीची मुंबई-गोवा क्रुझ वरील ड्रग्स पार्टीवरील कारवाई चर्चेमध्ये राहिली आहे. या प्रकरणामुळं राजकीय वर्तुळातही चर्चा रंगल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच राजकीय नेत्यांमध्येही आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. यामध्ये एनसीपी नेते नवाब मलिक (Nawab Malik) देखील समीर वानखेडे (Sameer Wankhed) यांच्यावर रोज नवनवे आरोप करत धक्कादायक खुलासे करत आहेत.

- Advertisement -

दरम्यान नवाब मलिक (Nawab Malik) यांनी राज्यातील ड्रग्ज प्रकरणाचे मास्टरमाईंड देवेंद्र फडणवीस असल्याचा खळबळजनक आरोप केला होता. याला प्रत्युत्तर देताना सर्व आरोपांचं खंडन केलं होतं. तसेच, दिवाळीच्या पहिल्या दिवशी नवाब मलिक यांनी लवंगी फटाका लावलाय, दिवाळीनंतर मी बॉम्ब फोडणार, असा इशारा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. त्यानुसार आज देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषद घेतली.

देवेंद्र फडणवीस यांनी ‘मराठी’ची क्षमा मागून हिंदी भाषेत पत्रकार परिषदेची सुरुवात केली. मी घोषणा केली होती की काही गोष्टी दिवाळीनंतर तुमच्यासमोर आणेन. थोडा उशीर झाला. कारण कागद गोळा करत होतो, काहींचे पत्रकार परिषदेचे दिवस आधीच बुक होते. असा टोला त्यांनी नवाब मलिक यांना लगावला.

अमिताभ बच्चनच्या चित्रपट सृष्टीतील प्रवासाला ५२ वर्ष

तसेच, मी सांगणार आहे ती सलीम जावेदची स्टोरीही नाही आणि इंटरव्हलनंतरचा सिनेमाही नाही. फार गंभीर आणि देशाच्या सुरक्षेशी जोडलेला हा मुद्दा आहे. सरदार शहावली खान हे १९९३ चे गुन्हेगार आहेत. यांना जन्मठेपेची शिक्षा झाली असून ते तुरुंगात आहेत. सर्वोच्च न्यायालयाने ती शिक्षा कायम केली आहे. टायगर मेमनच्या नेतृत्वात ते फायरिंगच्या ट्रेनिंगमध्ये सहभागागी झाले. बीएसई आणि पालिकेमध्ये बॉम्ब कुठे ठेवायचे, याची रेकी त्यानी केली होती. टायगर मेमनच्या घरी बॉम्बब्लास्टच्या कारस्थान मांडणीवेळी ते उपस्थित होते. टायगर मेमनच्या घरी गाड्यांमध्ये त्यानी आरडीएक्स भरलं. साक्षीदारांनी याविषयी साक्ष दिल्यानंतर न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा दिली.’ अशी ते म्हणाले

  • फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे

  • सरदार शाहावली खान याला मुंबई बाँबस्फोटात खटल्यात जन्मठेप झाली. सलीम पटेल हे दाऊद इब्राहीमच्या बहिणीचा बॉडीगार्ड. या दोघांकडून जमीन घेतली.

  • मुंबई बाँबस्फोट खटल्यातील आरोपींनी कुर्ल्यात एल.बी.एस. रोडवरील तीन एकरची जागा स्वालीडस कंपनीला विकली. ही कंपनी मलिक यांच्या परिवाराची आहे.

  • मुंबई बाँबस्फोटातील आरोपींनी कोट्यावधींची जमीन मलिकांना स्वस्तात का विकली?

  • माझ्याकडे पाच मालमत्तेची कागदपत्रे आहेत.

  • मलिकांचे सर्व पुरावे राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनाही देणार

  • मी तुम्हाला पाच प्रकरण देणार, आता फक्त २००५ चे दिले, त्यानंतर इतरही प्रकरण देणार

  • ३ एकर खरेदी झाली ३० लाखात, त्यातील २० लाखांचंच पेमेंट झालं. यातील सलीम पटेलला १५ लाख मिळाले आणि १० लाख शाह वली खान म्हणजेच सरदार खानला मिळाले

माधुरी भाड्याच्या घरात राहणार, महिन्याच्या भाड्यात तुमचे स्वत:चे घर होणार

फडणवीसांचे मलिकांना प्रश्न

  • मुंबईच्या गुन्हेगारांकडून तुम्ही जमीन खरेदी का केली?

  • मुंबईत बॉम्बस्फोच करणाऱ्यांकडून तुम्ही जमीन का खरेदी केली?

  • कोणत्या कारणामुळे त्यांनी एलबीएसमधली ३ एकरची जमीन इतक्या स्वस्तात दिली.

  • आरोपींवर टाडा लागला होता. टाडाच्या कायद्यानुसार आरोपीची सगळी मालमत्ता सरकार जप्त करते. मग टाडाच्या आरोपीची जमीन जप्त होऊ नये, यासाठी तुम्हाला ट्रान्सफर केली गेली का?

  • अंतिम रजिस्ट्री झाली त्याच्या काही दिवस आधी नवाब मलिक यांना मंत्रीपद सोडावं लागलं. पण तुम्हाला माहिती नव्हतं की सलीम पटेल कोण आहे?

- Advertisment -

ताज्या बातम्या