Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याराज्यात राष्ट्रपती राजवटदेखील लागू शकते; चंद्रकांत पाटलांचा बॉम्ब

राज्यात राष्ट्रपती राजवटदेखील लागू शकते; चंद्रकांत पाटलांचा बॉम्ब

मुंबई | Mumbai

नियमात बदल करून आता राज्यपालांकडे तारीख मागितली जात आहे. यापूर्वी घटनेप्रमाणे राज्यपालांनी दोन वेळा तारीख दिली. तरीही विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेण्यात आली नाही….

- Advertisement -

राज्यपालांनी दिलेल्या निवडणूक न घेणे हा राज्यपालांचा (Governor) आणि पर्यायानं घटनेचा अवमान असतो. घटनेचा अवमान केल्याच्या मुद्द्यावरदेखील राष्ट्रपती राजवट लागू शकते, असे विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केले.

राज्याचे हिवाळी अधिवेशन (Winter Session) सुरु असून अध्यक्षपदाची निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. नाना पटोले (Nana Patole) यांनी राजीनामा दिल्यानंतर अद्याप अध्यक्षाची निवड झालेली नाही.

ती यावेळी आवाजी मतदानाने घेण्यासाठी महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) सरकारच्या हालचाली सुरु आहेत. यावरून आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हे विधान केले आहे.

ते म्हणाले की, मला या चर्चेमध्ये पडायचे नाही. राज्यपाल हे एक स्वायत्त पद आहे. त्यांनी काय करायचे हे तेच ठरवतील. विधानसभा अध्यक्षपद निवडीचा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या शिफारसीने महाविकास आघाडीच्या तीन मंत्र्यांच्या शिष्टमंडळाने रविवारी राज्यपालांकडे सुपूर्द करण्यात आला. यासंदर्भात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी कायदेशीर सल्ला घेणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या