Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्यायोगींच्या शपथविधीसाठी जंगी तयारी; संपूर्ण युपीत होणार घंटानाद

योगींच्या शपथविधीसाठी जंगी तयारी; संपूर्ण युपीत होणार घंटानाद

लखनऊ | Lucknow

योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या शपथविधीसाठी (oath ceremony) भाजपने (BJP) जय्यत तयारी केली आहे. शपथविधीच्या दिवशी अनेक गावातील मंदिरांमध्ये (Temples) घंटानाद तसेच लोककल्याणासाठी आरती आणि पूजा अर्चा केली जाणार असल्याचे समजते…

- Advertisement -

शपथविधीसाठी सर्व मठ आणि मंदिरांतील ऋषी-मुनींना लखनऊला येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच लखनऊला येणार्‍या प्रत्येक कार्यकर्त्याने वाहनावर झेंडे (Flags) घेऊन यावे, अशा सूचनादेखील देण्यात आल्या आहेत.

शपथविधी कार्यक्रमाच्या दिवशी सकाळी 8 ते 10 या वेळेत राज्यातील सर्व शक्ती केंद्र स्तरावरील कार्यकर्ते जनकल्याणासाठी प्रार्थना करणार आहेत. उत्तर प्रदेशातील (UP) सर्व जिल्ह्यांतील सर्व प्रमुख चौक, बाजारपेठांमध्ये होर्डिंग्ज (Hoardings) लावण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) प्रत्येक विभागातील प्रत्येकी दोन कार्यकर्त्यांना एक दिवस आधी म्हणजे 24 मार्च रोजी लखनऊला बोलावण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या