Friday, April 26, 2024
Homeराजकीयराज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर- प्रवीण दरेकर

राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर- प्रवीण दरेकर

पुणे |प्रतिनिधी| Pune

हाथरसच्या घटनेचे राजकीय भांडवल करून देशभर बोलबाला करणारे आता कुठे झोपलेत? असा सवाल

- Advertisement -

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर तोफ डागली आहे. मुंबईसह महाराष्ट्रात रोज हाथरस घडत आहे. शिरूर तालुक्यातील न्हावरे या गावातील महिलेने विनयभंगाला विरोध केला म्हणून तिचे डोळे निकामी करण्यात आल्याची घटना मानवतेला काळीमा फासणारी असून या घटनेमुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याची टीका त्यांनी केली.

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील न्हावरे येथे विनयभंगाला विरोध करणाऱ्या महिलेचे डोळे निकामी करण्यात आल्याची गंभीर घटना घडली होती. या घटनेतील गंभीर जखमी महिलेवर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरु आहे. महिलेच्या नातेवाईकांची भेट घेत प्रवीण दरेकर यांनी त्यांच्या कुटुंबाला आधार दिला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शिरूर मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर हे देखील उपस्थित होते.

दरेकर म्हणाले, पुणे जिल्ह्यात मागील काही दिवसात अशा घटना अनेक घडल्या आहेत. महिलेचे दोन्ही डोळे निकामी झाले आहे. हे हृदय हेलवणारे आहे.एवढी गंभीर घटना असून देखील आरोपीला अद्याप अटक नाही. अशा घटनांमध्ये आरोपीचा शोध युद्ध पातळीवर घ्यायला हवा. तसेच काबाडकष्ट करूनपोट भरणारा परिवार आहे. त्यांच्या पाठीशी आम्ही सर्व जण आहोत. पुण्यासाठी ही अशोभनीय घटना आहे. आमची मान शरमेने खाली जायला लावणारी ही घटना आहे असेही दरेकर म्हणाले.

मला फक्त डोळे द्या अशी पिडीतीची मागणी आहे, डोळे परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू किमान एक डोळा तरी पूर्ववत व्हावा असे सांगून दरेकर म्हणाले, मला फक्त डोळे आणा मी सर्व सांगते, साहेब मी सर्व ओळखते अशी विनवणी त्या महिलेने केली असे दरेकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

पुणे जिल्हयात आशा घटना घडता कामा नये,घरच्याना मदतीसाठी प्रयत्न केला जावा. राज्य सरकार भाबवलेलं आहे, कोणाचा कोणाला मेळ नाही, ११ वी प्रवेश प्रक्रियेचा गोधळ सुरू आहे ,एक मंत्री एक म्हणतो, दुसरा काही वेगळं म्हणतो, अशी टीकाही त्यांनी केली.

दरम्यान, खासदार अमोल कोल्हे यांनी हे घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. या महिलेचे पुनर्वसन करण्यासाठी सर्वोतेपरी सहकार्य केले जाईल असे असे सांगून या महिलेचे डोळे पूर्ववत होण्याची शक्यता कमी असल्याचे सांगीतले. महिलांवरील अत्याचार कदापि कहापून घेतले जाऊ नयेत. या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेतले असून असे कृत्य करण्याचे धाडस कोणी करू नये यासाठी आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे असे ते म्हणाले. मात्र, अशा घटनेमध्ये राजकारण आणू नये असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.

- Advertisment -

ताज्या बातम्या