Monday, April 29, 2024
Homeराजकीयमंदिरं उघडणे म्हणजे उशिरा सुचलेलं शहाणपण

मंदिरं उघडणे म्हणजे उशिरा सुचलेलं शहाणपण

मुंबई l Mumbai

राज्यातील धार्मिक स्थळे उघडण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परवानगी दिली आहे. आज याबाबतची माहिती देण्यात आली. येत्या, सोमवारपासून म्हणजेच दिवाळी पाड्व्यापासून मंदिरे आणि सर्व धर्मियांचे प्रार्थनास्थळे पूर्णपणे खुली करण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांची राज्य सरकारवर टीका केली आहे.

- Advertisement -

मंदिरे उघडण्याचा निर्णय इगोपोटी रखडवला, मंदिरे उघडणे म्हणजे उशिरा सुचलेले शहाणपण, अशी टीका भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. मंदिर उघडण्याच्या ठाकरे सरकारच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना ठाकरे सरकारला प्रवीण दरेकरांनी खडे बोल सुनावले. हा निर्णय या सरकारने आधीच घ्यायला हवा होता. पण केवळ आंदोलकांना, पुजाऱ्यांना वारकऱ्यांना भाजप सपोर्ट करते, मग अहंकारातून त्यांना मदत करायची नाही, हा निर्णय इगोपोटी रखडवला होता, अशी टीकाही प्रवीण दरेकरांनी केली आहे.

उशिरा का होईना सरकारला शहाणपण सुचले, सर्वांना या निर्णयामुळे दिलासा मिळेल, असेही प्रवीण दरेकरांनी अधोरेखित केले आहे. बार आणि रेस्टॉरंट सुरू होतात, मग हा निर्णय का रोखला होता, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. आमची मागणी हीच होती. गरीब माणूस पांडुरंग किंवा परमेश्वराचरणी समाधान आणि शांती शोधत असतो. शिवाय जे व्यवसाय यावर अवलंबून असतात, त्यांचीही उपासमार होणार नाही, अशी आमची मागणी असल्याचेही प्रवीण दरेकरांनी स्पष्ट केले आहे.

भाजपनी सरकारचे डोळे उघडले – नितेश राणे

भाजप आमदार नितेश राणे यांनी म्हंटले आहे कि, “भाजप नी सरकारचे डोळे उघडले..म्हणुनच मंदिराचे दारे उघडले!!” तसेच त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे आभार मानले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या