Thursday, April 25, 2024
Homeराजकीयप्रशांत किशोर आणि शरद पवारांची भेट राजकीय नाही - अजित पवार

प्रशांत किशोर आणि शरद पवारांची भेट राजकीय नाही – अजित पवार

पुणे (प्रतिनिधि) – राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची त्यांच्या ‘सिल्वर ओक’ या निवासस्थानी भेट घेतल्यानंतर अनेक राजकीय तर्क वितर्कांना उधाण आले आहे. दरम्यान, वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेकजण “शरद पवारांना वडीलकीच्या नात्याने भेटत असतात. त्यापैकीच ही भेट असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले. ही भेट २०२४ मधील लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने आहे का ? असे विचारण्यात आले असता, त्यांनीच आता ही माझी शेवटची निवडणूक असल्याचे सांगितल्याचे म्हणत अजित पवारांनी या विषयाला पूर्णविराम दिला.

सध्या देशातील राजकीय वर्तुळात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीची चांगलीच चर्चा रंगली आहे. पश्चिम बंगाल निवडणुकीनंतर प्रशांत किशोर यांनी राजकीय रणनीतिकार म्हणून आपण संन्यास घेत असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतरही शरद पवारांच्या भेटीसाठी प्रशांत किशोर पोहोचल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. २०२४ मध्ये भाजपला तगडे आव्हान देण्यासाठी विरोधकांकडून प्रयत्न सुरु असताना या भेटीचा संदर्भ जोडला जात आहे.

- Advertisement -

पुण्यात प्रसारमाध्यमांशी अजित पवार यांनी संवाद साधला. अजित पवार म्हणाले कि, ‘प्रशांत किशोर आणि पवारांची भेट राजकीय नाही. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. देशाचे नेते आहेत. त्यांना भेटण्यासाठी, त्यांचा वडिलकीच्या नात्याने सल्ला घेण्यासाठी अनेक नेते भेटत असतात. त्यानुसारच प्रशांत किशोर त्यांना भेटत आहेत.’मी कोणत्याही निवडणुकीत सहभागी होणार नसल्याचे प्रशांत किशोर यांनी सांगितले आहे. आता त्यांचे मागील काही अनुभव असतील, वेगळी काही कामे असतील. पण त्यांनी राजकारणाचे क्षेत्र आता सोडले आहे. त्यामुळे त्या क्षेत्राची चर्चा होण्याचे कारण नाही असे ते म्हणाले.

अजित पवारांनी पोलिस आयुक्तांना सुनावले

गुप्ता, मला अशा कामाच्या पाहणीला बोलावलं तर मी लय बारीक बघतो. माझ्या भाषेत बोलायचं तर हे काम छा-छू काम आहे. या ठेकेदाराने पोलिसांचंच काम असं केलं असेल तर बाकीच्यांच काय? असे अजित पवार यांनी पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना सुनावले.

अजित पवार यांनी बुधवारी पुण्यातील पोलीस मुख्यालयाच्या कामाची पाहणी केली. यावेळी कामाचा दर्जा पाहून अजित पवार यांचा पारा चांगलाच चढला. त्यानंतर अजित पवार यांनी थेट आयुक्तांना सुनावले. गुप्ता, मला अशा कामाच्या पाहणीला बोलावलं तर मी लय बारीक बघतो. माझ्या भाषेत बोलायचं तर ह छा-छू काम आहे. या ठेकेदाराने पोलिसांचंच काम असं केलं असेल तर बाकीच्यांच काय, असे अजित पवार यांनी म्हटले. यानंतर अजित पवार यांनी पोलीस मुख्यालयात फिरून बांधकामातील त्रुटी दाखवून दिल्या. तसेच अधिकाऱ्यांना या सर्व त्रुटी सुधारण्याच्या सूचनाही दिल्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या