Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्या“अनावधानाने माझ्याकडून दुसरा...”' शिवरायांच्या जन्मस्थळाविषयी केलेल्या विधानावर प्रसाद लाड यांची दिलगिरी

“अनावधानाने माझ्याकडून दुसरा…”’ शिवरायांच्या जन्मस्थळाविषयी केलेल्या विधानावर प्रसाद लाड यांची दिलगिरी

मुंबई | Mumbai

भाजपाचे नेते तथा आमदार प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला, असे विधान केले आहे. प्रसाद लाड यांच्या या विधानानंतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आक्रमक पवित्रा धारण केला आहे. विरोधकांकडून भाजपवर टीकेची झोड उठवण्यात आल्यानंतर प्रसाद लाड बॅकफुटवर गेले आले. त्यांनी याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.

- Advertisement -

“छत्रपती शिवराय हे संपूर्ण विश्वाचे आराध्य दैवत आहेत. महाराजांची कर्मभूमी कोकण होती, स्वराज्याची मुहूर्तमेढ कोकणात रोवली गेली हे देखील विसरून चालणार नाही. अनावधानाने माझ्याकडून दुसरा शब्द प्रयोग झाला. परंतु त्वरित चूक दुरुस्त केली. विश्वाचे आराध्य दैवत शिवरायांचा सन्मान आम्ही यापुढेही ठेवणार! कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो.” असे स्पष्टीकरण भाजप आमदार प्रसाद लाड यांनी दिले.

काय म्हणाले होते प्रसाद लाड?

छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला, असं वादग्रस्त वक्तव्य भाजपा आमदाराने केलं आहे. भाजपाचे आमदार प्रसाद लाड स्वराज्यभूमी कोकण महोत्सवात बोलताना महाराजांचा जन्म कोकणात झाला, असं म्हणाले. स्वराज्यभूमी कोकण महोत्सव कशासाठी तुम्ही विचाराल. पण हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. संपूर्ण भारताचं आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला,” असं प्रसाद लाड म्हणाले. त्यांच्या तोंडून कोकण शब्द बाहेर येताच बाजूला असलेल्या पदाधिकाऱ्याने ‘महाराजांचा जन्म शिवनेरी येथे झाला, असं त्यांनी सांगितलंय.

- Advertisment -

ताज्या बातम्या