लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा पहिला उमेदवार जाहीर; सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितले नाव

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा पहिला उमेदवार जाहीर; सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितले नाव

मुंबई | Mumbai

मविआमध्ये शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि एकसंध काँग्रेस असे तीन पक्ष आहेत. शिवाय त्यांच्यासोबत मित्रपक्षही आहेत. अशातच या तीन पक्षांना शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि बलाढ्य भाजपासोबत दोन हात करायचे आहेत. यामुळे येती निवडणूक चुरशीची ठरणार आहे. असे असताना कोणत्या पक्षाला किती जागा, कोणकोणत्या जागा याचा तिढा अद्याप सुटलेला नाही.

अशातच सुशिलकुमार शिंदे यांनी सोलापूरच्या लोकसभा मतदारसंघातून आमदार प्रणिती शिंदे उमेदवार असणार असल्याचे स्पष्ट केले आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सुशीलकुमार शिंदे हे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला अभिवादन करण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी राजकारणातून निवृत्ती जाहीर केल्याचे म्हटले आहे. तसेच येत्या लोकसभा निवडणुकीसाठी प्रणिती शिंदे याच काँग्रेसच्या उमेदवार असतील, असेही त्यांनी जाहीर केले आहे. मला जे करता येईल ती मदत मी करणार असल्याचेही शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com