Wednesday, April 24, 2024
Homeराजकीय'महाराष्ट्राच्या अब्रूची लक्तरं निघाली'; प्रकाश जावडेकरांचा घणाघात

‘महाराष्ट्राच्या अब्रूची लक्तरं निघाली’; प्रकाश जावडेकरांचा घणाघात

दिल्ली l Delhi

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी महाविकासआघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या पत्रावरून केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी देखील राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. ते नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते.

- Advertisement -

‘महाराष्ट्रात गेल्या तीस दिवसांपासून सुरू असलेल्या गोंधळाचा रेकॉर्ड ठेवणंही कठीण काम आहे. इतकं महाराष्ट्राला बदनाम करण्याचं काम महावसुली आघाडी सरकारनं केलं आहे. सचिन वाझे प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या अब्रूची लक्तरं निघाली आहे. सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार उरलेला नाहीय’, अशा शब्दांत टीका केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज केला आहे.

तसेच, ‘दोन वर्षांपूर्वी वाझेला सेवेत घेतलं. फडणवीस म्हणाले ठाकरेंचा आग्रह होता म्हणून परमबीर सिंग यांनी त्यांना पुन्हा सेवेत घेतलं. जगात सगळं पाहिलं असेल, पण पोलीसच बॉम्ब ठेवतात हे कुणी पाहिलं नसेल. हेही मुंबईने पाहिलं. पोलीसच ज्याची गाडी चोरी झाली ती घेऊन जातात आणि त्यातच बॉम्ब ठेवतात.

त्यानंतर ज्याची गाडी असते त्याची हत्या होते. हत्या कोणत्या हेतूने झाली हे तर आता समोर येईलच. नंतर मध्येच परमबीर सिंग यांचं पत्र येतं. एका न्यायाधीशांची समिती स्थापन होते. रश्मी शुक्लांचा अहवाल येतो. मग सीबीआयची चौकशी सुरू होते. अनिल देशमुखांचा राजीनामा येतो. एनआयएचा तपास सुरूच आहे. वाझेच्या गाड्या आणि पराक्रमातून रोज नवनवे खुलासे होतात. आणि आता वाझेचं पत्र आलंय’, असं प्रकाश जावडेकर यावेळी म्हणाले.

सचिन वाझे प्रकरणात इतकं काही घडत असताना राज्याचे मुख्यमंत्री अद्याप गप्प का आहेत? त्यांनी सुरुवातीला वाझेचं समर्थन कशासाठी केलं होतं? शिवसेनेला जनतेच्या प्रश्नांना सामोरं जावंच लागेल, असंही जावडेकर म्हणाले.

महाराष्ट्रात सत्तेत असलेले सरकार हे जनादेशामुळे सत्तेत आले नाही. विधानसभा निवडणुका झाल्या त्या वेळी शिवसेना-भाजप युती होती. शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लाऊन प्रचार केला. आपले उमेदवार निवडूण आणले. पुढे जाऊन केवळ वसूली हाच उद्देश डोळ्यासमोर ठेऊन महाविकासआघाडी सरकार सत्तेत आले, असा घणाघाती आरोप प्रकाश जावडेकर यांनी केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या