Wednesday, April 24, 2024
Homeराजकीयआरोग्य सोई-सुविधा तात्काळ उपलब्ध करुन द्या - प्रकाश जावडेकर

आरोग्य सोई-सुविधा तात्काळ उपलब्ध करुन द्या – प्रकाश जावडेकर

पुणे (प्रतिनिधी) | Pune –

नागरिकांमध्ये ‘कोरोना’ विषाणूची भीती कमी करण्याची गरज आहे. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी रुग्णालयातील खाटांबाबतची माहिती

- Advertisement -

डॅशबोर्डवर अद्ययावत करावी. कोरोनाच्या काळात नागरिकांना उत्तम आरोग्य सोई-सुविधा तात्काळ उपलब्ध करुन द्यावात, अशा सूचना केंद्रीय पर्यावरणमंत्री जावडेकर यांनी दिल्या.

पुण्यातील विधान भवन सभागृहात केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली व ज्येष्ठ नेते तथा खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसोबत कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या आढावा व नियोजनाबाबत बैठक घेण्यात आली.

पुणे, पिंपरी-चिंचवड शहर व पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात वाढता कोरोनाचा संसर्ग रोखणे गरजेचे आहे. शासनाने लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर नागरिक मोठ्या प्रमाणावर विनामास्क घराबाहेर पडतांना दिसत आहे. त्यामुळे ‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांमध्ये मास्कचा नियमित वापर करण्याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिले.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधांना कोरोनाच्या काळात कोणत्या यंत्रणेकडे कोणती जबाबदारी दिली आहे याबाबत माहिती द्या. कोरोनाच्या काळात सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या अनुभवाचा उपयोग होण्यासाठी मानधन तत्वावर नियुक्ती करा. मास्क न वापरता घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांवर करण्यात येणाऱ्या कार्यवाहीची मोहिम अतिप्रभावी करा, अशा सूचना उपमुख्यमंत्री पवार यांनी केल्या.

आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, मेगाभरती अंतर्गत प्राप्त झालेल्या उमेदवारांच्या अर्जांची छानणी करुन कायमस्वरुपी रिक्त पदाची भरती प्रकिया सुरु आहे. कोविडच्या अनुषंगाने तात्पुरती मनुष्यबळांची भरती करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. ग्रामीण भागातील रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार करण्यासाठी टेली-एक्सरे सुविधा उपलब्ध करण्याची कार्यवाही सुरु आहे. नागरिकांची आरोग्य सुविधा वेळेत मिळव्यात यासाठी 50 टक्के नवीन रुग्णवाहिका खरेदी करणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री टोपे यांनी दिली.

कोरोना रुग्णाला उपचारांती खासगी रुग्णालयांकडून देण्यात येणाऱ्या देयकांचे लेखापरीक्षण करा. यामध्ये ऑक्सिजन दर, पीपीई संच इत्यांदी बाबी शासनाच्या परिपत्रकान्वये आकारणी केली आहे का? त्यांची तपासणी करा. ऑक्सिजनच्या पुरवठ्याध्ये तुटवडा होणार नाही याबाबत विशेष लक्ष द्या. डॅशबोर्डवर नागरिकांना मार्गदर्शन मिळावे याबाबत नोंद घेवून कार्यवाही करा. महात्मा फुले जन आरोग्य योजनेत कोविड-19 च्या अनुषंगाने 20 पॅकेजसाठी खासगी रुग्णालयाने मोफत उपचार करण्याची तरतूद आहे त्याप्रमाणे कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार झालेच पाहिजे. याचे उल्लघंन करणाऱ्या खासगी रुग्णालयांवर दंड आकारणी करा, अशा सूचना आरोग्यमंत्री टोपे यांनी यावेळी दिल्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या