Thursday, April 25, 2024
Homeराजकीयसाखर संघाने शरद पवारांची भाषा बोलू नये

साखर संघाने शरद पवारांची भाषा बोलू नये

खरवंडी कासार |वार्ताहार| Kharwandi Kasar

ऊस तोडणी कामगारांच्या न्याय मागण्यासंदर्भात साखर संघ आणि लवाद हे ऊसतोडणी कामगाराची बाजू ऐकून न घेता ते शरद पवाराची भाषा बोलत आहेत.

- Advertisement -

यामुळे ऊस तोडणी कामगारांना न्याय मिळत नाही. यामुळे साखर संघाने शरद पवार यांची भाषा बोलू नये, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.

दरम्यान, ऊसतोड कामगारांच्या मागण्यांबाबत होणारा करार हा सरकार, साखर संघ आणि लवाद यांच्यात न होता, ऊसतोड कामगारांच्या प्रतिनिधी यांची समिती गठीत करून मुख्यमंत्री आणि ऊसतोड कामगारांच्या सघंटनेचे प्रतीनिधी यांच्यामध्ये त्रिपक्षीय व्हावा. या सर्व निर्णय प्रक्रियेचे अधिकार हे मुख्यमंत्र्यांना असावेत, अशी मागणी करत भाजप नेत्या पकंजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या लवादाच्या निर्णयाला विरोध दर्शवत ऊसतोड कामगारांचा संप सुरूच राहणार असल्याचे अ‍ॅड. आंबेडकर यांनी ठणकावून सांगितले आहे.

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. आंबेडकर यांच्या उपस्थितीज भगवान गड (खरवंडी कासार) येथे पार पडला. यावेळी ते बोलत होते. मेळाव्याला वंचित आघाडीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष धनराज वंजारी, वंचित उसतोड कर्मचारी सघंटनेचे प्रदेशाध्यक्ष शिवराज बागंर, गहिनीनाथ ढाकणे, बाळासाहेब सानप, बीड जिल्हाध्यक्ष अनिल डोगरे अहमदनगर जिल्हाध्यक्ष प्रतिक बारसे आदी उपस्थित होते.

यावेळी अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले, उस तोडणी होणे ही साखर कारखानदारांची गरज आहे. सपांच्या माध्यमातून उस तोडणी कामगार हे साखर कारखानदांराचे नाक दाबले असून कामगारांच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय एकही उस तोड कामगार तोडणीसाठी जाणार नाही. साखर कारखानदारांचे राजकारण हे कारखान्यांच्या पैशावर सुरू आहे. दुसरीकडे हारवेस्टर (ऊस तोडणी मशीन) मुळे बुडापासून ऊस तुटत नाही. यामुळे हे मशीन सर्व उस तोडू शकत नाही. ही कामगारांसाठी जमेची बाजू आहे. यामुळे कामगारांनी सघंटीत राहून संप सुरू ठेवावा.

यापूर्वी लोकनेते गोपीनाथ मुंढे हे साखर संघाकडे कामगाराची बाजू लाऊन धरत होते आणि कामगारांना न्याय मिळत होता.त्यांच्या पश्चात उसतोडणी कामगारांच्या न्याय मागण्यासंदर्भात साखर संघ आणि लवाद हे उसतोडणी कामगाराची बाजू ऐकुण न घेता ते शरद पवाराची भाषा बोलत आहेत. यामुळेच कामगारांना न्याय मिळत नाही. ऊसतोड मजुरांच्या सपांत वंचीत आघाडीने सहभाग घेतल्याने आता कारखांन्याचे गाळप होणा नाही.

महाराष्ट्राच्या इतिहासात भगवानगड ही भूमी लढाऊ व क्रांतीची भूमी असल्याची ओळख आहे. यामुळे येथून क्रांतीचा लढा सुरू केला असून मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरू ठेवणार असल्याचे अ‍ॅड. आंबेडकर यांनी जाहीर केले.

यावेळी बागंर म्हणाले, आ. सुरेश धस व त्यांच्या पक्षाची भूमिका विसगंत असली तरी उसतोड मजुराच्या मागण्यांसदर्भात आ. धसाची भूमिका प्रामाणिक आहे. त्यांनी वंचित आघाडीच्या नेतृत्वाखाली काम करावे, असे आवाहान त्यांनी केले. जिल्हाध्यक्ष खेडकर यांनी प्रस्ताविक केले. यावेळी जाधव, बारसे, पवळे सूधाकर गर्ज, लहु दराडे, सोपान जवरे, प्रल्हाद किर्तने, अविनाश जवरे, रशिद तांबोळी, आमित भुईगल, संदीप शिरसाठ, अनिल साठे आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या