Saturday, April 27, 2024
Homeराजकीयराज्यातील दुकाने उद्यापासून उघडावीत

राज्यातील दुकाने उद्यापासून उघडावीत

औरंगाबाद | Aurangabad –

लॉकडाऊन मान्य करू नका. राज्यातील सर्व दुकानदारांनी दुकाने 1 तारखेपासून उघडावीत, असं आवाहन करत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी Vanchit Bahujan Aghadi chief Prakash Ambedkar पुन्हा एकदा लॉकडाऊनविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. पाहिजे तर मला अटक करा. माझ्यावर गुन्हा दाखल करा, मी घाबरत नाही असं म्हणत त्यांनी राज्य सरकारलाही आव्हान दिलं आहे.

- Advertisement -

देशात आपल्या लोकसंख्येपैकी केवळ 5 टक्के लोक कोरोनामुळे बाधित होऊ शकतात आणि केंद्र आणि राज्य सरकार 95 टक्के लोकांवर अन्याय करीत आहेत. येत्या 1 तारखेपासून सर्वांनी आपापली सर्व दुकाने उघडून व्यवहार करावेत.

बकरी ईद मुस्लीम बांधवांनी मोकळेपणाने साजरी करावी आणि रक्षाबंधनही व्यवस्थित मोकळेपणाने साजरे करावं, असं आवाहनही प्रकाश आंबेडकर यांनी औरंगाबादमध्ये बोलताना केलं आहे.

दरम्यान, कोरोना विषाणूचा coronavirus प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनचा lockdown कालावधी 31 ऑगस्ट 2020 पर्यंत वाढवण्यात आला असला तरी मिशन बिगिन अगेन अंतर्गत टप्प्याटप्प्याने निर्बंध उठवण्यासाठी काही सुधारणा जाहीर करण्यात आल्या आहेत.

काही सवलतींमध्ये वाढ करत राज्यातील मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्सेस काही अटींच्या अधीन राहून 5 ऑगस्ट 2020 पासून सुरु करण्यास संमती देण्यात आली आहे. तसेच खेळाडुंचा संघ नसलेल्या काही आऊटडोअर खेळांना काही अटींच्या अधीन राहून 5 ऑगस्ट 2020 पासून संमती देण्यात आली आहे.

या कालावधीत विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हाधिकारी आणि महानगर पालिका आयुक्त त्यांच्या क्षेत्रात आवश्यक निर्बंध घालू शकतील. अत्यावश्यक नसलेल्या कामांसाठी तसेच नागरिकांच्या चलनवलनास प्रतिबंध घालू शकतील. लोकांनी या काळात सामाजिक अंतर, व्यक्तिगत स्वच्छता या बाबींचे पालन करणे आवश्यक राहील.

- Advertisment -

ताज्या बातम्या