"शरद पवारांच्या सभेला गर्दी करा, आपल्याशिवाय कोणीही..."; प्रफुल्ल पटेलांच्या कार्यकर्त्यांना सूचना

"शरद पवारांच्या सभेला गर्दी करा, आपल्याशिवाय कोणीही..."; प्रफुल्ल पटेलांच्या कार्यकर्त्यांना सूचना

मुंबई | Mumbai

राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) पक्षात फुट पडल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी महाराष्ट्रभर दौरा सुरु केला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी नाशिकच्या (Nashik) येवला (Yeola) तालुक्यात जाहीर सभा घेतली होती. आता ते लवकर भंडारा (Bhandara) येथे सभा घेणार असल्याची माहिती मिळत आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी शरद पवार यांना टोला लगावला आहे...

"शरद पवारांच्या सभेला गर्दी करा, आपल्याशिवाय कोणीही..."; प्रफुल्ल पटेलांच्या कार्यकर्त्यांना सूचना
तलाठी भरती परीक्षेची एसआयटी चौकशी करा - जयंत पाटलांची मागणी

राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर खासदार प्रफुल्ल पटेल हे पहिल्यांदाच भंडारा जिल्ह्यात दाखल झाले. यावेळी पटेल यांचा जंगी सत्कार करण्यात आला. त्यानंतर पटेल यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना शरद पवार (Sharad Pawar) यांना टोला लगावला.

"शरद पवारांच्या सभेला गर्दी करा, आपल्याशिवाय कोणीही..."; प्रफुल्ल पटेलांच्या कार्यकर्त्यांना सूचना
दोन वर्षात राज्यात सहा लाख जणांना गंडविण्याचा प्रयत्न

प्रफुल पटेल (Praful Patel) म्हणाले की, शरद पवार आपल्या जिल्ह्यात आले तर, मी स्वतः त्यांच्या स्वागतासाठी जाणार आहे. तुम्ही पण या. गर्दी जमवण्यासाठी आपण जावू, त्यांचे स्वागत करू. साहेबांच्या सभेला आपल्याशिवाय कोणीही गर्दी करू शकत नाही. त्यामुळे त्यांच्या सभेला आपण आवर्जून जाऊ. भाषणात माझ्याविरुद्ध बोलले तरी ते ऐकून घेऊ, असा टोला त्यांनी लगावला आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

"शरद पवारांच्या सभेला गर्दी करा, आपल्याशिवाय कोणीही..."; प्रफुल्ल पटेलांच्या कार्यकर्त्यांना सूचना
Nashik News : अखेर कांद्याचा तिढा सुटला! जिल्ह्यात उद्यापासून कांदा लिलाव सुरु होणार; केंद्रीय मंत्री डॉ.भारती पवारांची माहिती
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com