ठाकरे गटाचा राष्ट्रवादीला 'दे धक्का'; भाऊसाहेब पाटील चिकटगावकरांनी हाती घेतली 'मशाल'

ठाकरे गटाचा राष्ट्रवादीला 'दे धक्का'; भाऊसाहेब पाटील चिकटगावकरांनी हाती घेतली 'मशाल'

वैजापूर | प्रतिनिधी

शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठा दणका दिलेला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूरचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केला.

विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते आमदार अंबादास दानवे यांच्या मध्यस्थीने हा प्रवेश सोहळा आज मातोश्रीवर पार पडलेला आहे. माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांचा विरोध असतानाही राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून माजी जिल्हा परिषद सदस्य पंकज ठोंबरे यांना राष्ट्रवादीमध्ये प्रवेशात देण्यात आलेला आहे.

ठाकरे गटाचा राष्ट्रवादीला 'दे धक्का'; भाऊसाहेब पाटील चिकटगावकरांनी हाती घेतली 'मशाल'
वैजापूर तहसील कार्यालयाच्या शौचालयास कुलूप; महिलांची कुचंबना

त्यानंतर भाऊसाहेब पाटलांची नाराजी अधिकच वाढली गेली आणि लवकरच पक्ष सोडणार असल्याचं सूचक विधान देखील त्यांनी केलेलं होतं. आज अखेर त्यांनी घड्याळ सोडून हातात मशाल घेतली आहे. यामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसलेला आहे. भाऊसाहेब पाटील चिगटगावकर हे तेच आहे जे मोदी लाटेत देखील विधानसभेत निवडून आलेले होते.

आज काही पदाधिकाऱ्यांचा मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश झाला. यावेळी महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे साहेब, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री सुभाष देसाई साहेब, सहसंपर्कप्रमुख विनोद घोसाळकर आदी उपस्थित होते

ठाकरे गटाचा राष्ट्रवादीला 'दे धक्का'; भाऊसाहेब पाटील चिकटगावकरांनी हाती घेतली 'मशाल'
कंटेनरने दुचाकीस्वाराला चिरडले; एक जागीच ठार, एक गंभीर जखमी

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com