Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याPolitical Special : राजकीयदृष्ट्या उत्तर महाराष्ट्रातील नाशिक होतंय 'बारामती'; नेत्यांचे सतत दौरे,...

Political Special : राजकीयदृष्ट्या उत्तर महाराष्ट्रातील नाशिक होतंय ‘बारामती’; नेत्यांचे सतत दौरे, घडामोडींना वेग

नाशिक | फारुक पठाण | Nashik

अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकांसाठी (Lok Sabha and Vidhansabha Elections) सर्व पक्षीय नेते कमालीचे ‘अ‍ॅक्टीव्ह’ झाल्याचे पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे नाशिकमध्ये (Nashik) देखील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेनेपाठोपाठ (Shivsena) राष्ट्रवादी पक्षात (NCP) फुट पडल्याने दोन्ही नव्या गटांचे विशेष लक्ष नाशिकवर दिसत आहे…

- Advertisement -

Lalit Patil Arrested : ड्रग्ज माफिया ललित पाटीलला अटक; मुंबई पोलिसांची कारवाई

राज्यात आतापर्यंत शिवसेना-भारतीय जनता पक्षाची युती विरुध्द कॉंग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी असा संघर्ष पाहायला मिळाला होता. मात्र २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील हे चित्र अचानक बदलून शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसची महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) तयार झाली. त्यांनी थेट राज्याची सत्ता हातात घेऊन सुमारे अडीच वर्ष कारभार केला. भाजपसोबत (BJP) युतीत निवडणूक लढवून आकड्यांच्या जोरावर सेनेने दोन्ही कॉंग्रेसला जवळ करुन महाविकास आघाडी तयार करुन सत्ता काबीज केली. तर दुसरीकडे तब्बल सुमारे १०५ आमदारांची संख्या असूनही भाजपा सत्तेतून बाहेर ठेवल्याने त्याचा बदल घेण्यासाठी भाजपने थेट सेनेत सुरूंग लावून ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह सुमारे ४० आमदारांना फोडून त्यांच्यासोबत महायुती (Mahayuti) करुन राज्याची सुत्रे पुन्हा हाती घेतली. मात्र ज्या मुख्यमंत्रीपदावरुन युतीत फुट पडली ते मुख्यमंत्रीपद शेवटी भाजपला त्यावेळेचे फुटीर सेनेचे नेते एकनाथ शिंदे यांना द्यावे लागले तर भाजपला उपमुख्यमंत्रीपदावर समाधान मानावे लागले.

शिवसेनेच्या इतिहासात एवढ्या मोठ्या प्रमाणात बंड झाल्याने हे प्रकरण देशाच्या सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) गेले. त्यानंतर न्यायालयात व राज्यात सभापतींकडे सध्या सुनावणी सुरू आहे. मात्र, आमदार अपात्रेचा निकाल कधी होणार हे अद्याप निश्चित नाही. भाजपने शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना मुख्यमंत्री करुन डबल इंजिनचे सरकार सुरू केले. मात्र, सुमारे चार महिन्यांपूर्वी राज्यात आणखी एक राजकीय भूकंप होऊन शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतील ज्येष्ठ नेते तथा पवारांचे पुतणे अजित पवारांनी बंड करुन सुमारे त्यांनीही ४० आमदारांना (MLA) घेऊन भाजप-सेना युती सरकाराला पाठिंबा देऊन डबल इंजिनचे सरकार ‘ट्रिपल इंजिन’ करुन दिले. त्यानंतर राष्ट्रवादीत देखील अपात्र आमदारांसाठी न्यायालयात दाद मागण्यात आली आहे. हे सर्व घडत असतांना देशात लोकसभा तर राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहायला सुरूवात झाली आहे. यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दोन्ही सेना, दोन्ही राष्ट्रवादीसह कॉंग्रेस, मनसे, वंचित, प्रहार, स्वराज्य, आप, आदी पक्षांच्या नेत्यांची नजर नाशिककडे लागली आहे.

Ajit Pawar : भाजप पाठिंब्यावर अजित पवार मुख्यमंत्री?

सध्या शिवसेनेचे दोन गट जोमाने कामाला लागले आहेत. नाशिकची परिस्थिती पाहिली तर आतापर्यंत शिवसेनेला पाहिजे तसे यश मिळालेले नाही. शिवसेना नाव व धनुष्यबाण चिन्हाचा निर्णय झाल्यावर आमच्यामध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग होणार असे, शिंदे गटाचे वरिष्ठ नेते सांगत होते. मात्र, हे मिळाल्यावर देखील मोठा असा धमाका झाला नाही. याचे श्रेय ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते खा. संजय राऊत यांना द्यावे लागेत. नाशिकच्या काही नेत्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केले तरी अनेक नेते, पदाधिकारी अद्याप ठाकरेंच्या सेनेतच असून त्यांच्याकडे सतत इनकमिंग देखील होत आहे. मात्र, राजकारणात काहीही सांगता येत नाही हेही सत्य आहे.

राजकीय ‘हॉटस्पॉट’

नाशिक शहर व जिल्हा तसा राजकीयदृष्ट्या परिपक्व आहे. जिल्ह्यात तब्बल आमदारांचा गठ्ठा असल्याने सर्वच पक्षांच्या नेत्यांची नजर नाशिककडे लागली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नेत्यांचे दौरे नाशिकला वाढले आहे. राष्ट्रवादीत फुट पडल्यावर संस्थापक अध्यक्ष शरद पवार सर्वात पहिले नाशिकला आले होते. यावेळी त्यांनी येवल्यात सभा देखील घेतली होती. त्यांच्या पाठोपाठ उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील नाशिकचे दोन दौरे केले. तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत नियमित नाशिकला येत असून कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह इतर नेत्यांच्या उपस्थितीत नाशिक शहरात उत्तर महाराष्ट्र आढावा बैठकीचे आयोजन केले होते. तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी पदभार घेतल्यानंतर त्वरीत नाशिक दौरा केला होता. तर पंकजा मुंडे यांची शिवपरिक्रमा यात्रा नुकतीच नाशिकमधून पुढे गेली. त्यानंतर आता इतर पक्षांचे नेते देखील नाशिकला येत असल्याने नाशिक हा राजकीय हॉटस्पॉट झाला आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Gopichand Padalkar : “महाराष्ट्रात जाती-जातीत भांडण लावणारा लांडगा कोण हे सगळ्या…”; गोपीचंद पडळकरांची पुन्हा पवार कुटुंबावर टीका

- Advertisment -

ताज्या बातम्या