रिक्षाचालकांच्या मदतीसाठी राजकीय पक्ष सरसावले

मदत कक्ष : भाजपतर्फे आमदार राजूमामा भोळे तर शिवसेनेतर्फे महापौरांच्याहस्ते उद्घाटन
रिक्षाचालकांच्या मदतीसाठी राजकीय पक्ष सरसावले

जळगाव - Jalgaon :

करोनाच्या पार्श्वभूमिवर असलेल्या लॉकडाऊन मुळे आर्थिक संकटात सापडलेला परवानाधारक रिक्षा चालकांना शासनाच्या अर्थ सहाय्य या योजनेतंर्गत 1 हजार 500 रुपयांचे सानुग्रह अनुदान योजनेचा लाभ देण्यात येत आहे.

या पार्श्वभूमिवर जळगाव शहरातील नूतन मराठा कॉम्प्लेक्स येथील आमदार सुरेश दामू भोळे यांच्या जनसंपर्क कार्यालयात रिक्षाचालकांकरीता मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षाचे आज मंगळवारी आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येवून शुभारंभ करण्यात आला.

भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सूर्यवंशी, ऑटो रिक्षा चालक मालक संघटना कृती समिती महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष तथा नेताजी सुभाष चंद्र बोस रिक्षा युनियन चे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद सोनवणे, भाजपा ऑटो रिक्षा स्कूल व्हॅन आघाडी महानगर जिल्हाध्यक्ष प्रमोद वाणी, उपाध्यक्ष संदीप वाणी यांच्या नेतृत्वाखाली हा सेवा कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

सेवा कक्षातर्फे आज 25 मे ते 05 जून 2021 दरम्यान सकाळी 10.00 ते संध्याकाळी 06.00 वाजेपर्यंत रिक्षा चालकांना या ऑनलाईन अर्ज भरण्यासह मदत करण्यात येवून योजनेचा लाभ मिळवून देण्यात येणार आहे. आज मंगळवारी रिक्षा चालक रमेश सोनार, काशिनाथ चौधरी, शरद जोशी, गणेश चौधरी, सुभाष पाटील, हितेंद्र टेकावळे व इतर चालकांना अर्ज भरण्यात येवून संंबंधितांना आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते भरलेल्या ऑनलाईन अर्जाची प्रिन्ट देण्यात आली. तरी परवानाधारक रिक्षाचालकांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी आमदार सुरेश भोळे यांच्या जनसंपर्क कार्यालयावर संपर्क करावा. असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, या कक्षाच्या माध्यमातून रिक्षा चालकांना ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी प्रल्हाद सोनवणे, प्रेमसिंग पाटील, प्रमोद वाणी, संदीप वाणी यांच्याशी संपर्क साधून अर्ज भरुन घेण्याचे आवाहन भाजपातर्फे करण्यात आले आहे.

शिवसेना जळगाव महानगर तर्फे शिवसैनिक विराज कावडीया यांच्या नेतृत्वात पांडे चौक येथे रिक्षा चालक बांधवांसाठी मदत कक्ष सुरू करण्यात आला. आज मंगळवारी सकाळी 11 वाकता या मदत कक्षाचे उद्घाटन महापौर जयश्री महाजन, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी महेश देशमुख, माजी महापौर नितिन लढ्ढा, शिवसैनिक विराज कावडीया यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी माजी महापौर विष्णू भंगाळे, शिवसेना महानगर प्रमुख शरद तायडे, नगरसेवक प्रशांत नाईक, नितिन बरडे, अनंत जोशी, गणेश सोनवणे, मनोज चौधरी, शिवसेना महिला महानगर प्रमुख शोभा चौधरी, शिवसैनिक विराज कावडीया, जितेंद्र छाजेड, प्रकाश कावडीया उपस्थित होते. 25 ते 5 जून पर्यंत शहरातील परमीटधारक रिक्षाचालक बांधवांना ऑनलाईन अर्ज या ठिकाणी भरून देण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनातर्फे राज्यातील 7 लाख 15 हजार परमिटधारक रिक्षा चालकांना लॉकडाऊच्या पार्श्वभूमीवर अर्थसहाय्य म्हणून 1 हजार 500 रूपये घोषीत करण्यात आले आहे. सदर रक्कम परमिटधारक रिक्षाचालकांच्या बँक खात्यात जमा होणार असून यासाठी त्यांना ऑनलाईन अर्ज करावयाचा आहे.

यासाठी आधार कार्ड, बँक खाते क्रमांक, लायसन्स, बॅच, रिक्षा परवाना इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता आहे. शिवसेना मदत कक्षाला वेलकम सायबर कॅ फे यांचे अनमोल सहकार्य लाभत आहे. तरी जास्तीत जास्त रिक्षा चालक बांधवांनी या शासकीय योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन शिवसैनिक तथा युवाशक्ती फाऊंडेशनचे संस्थापक विराज कावडीया यांनी केले आहे.

उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवसैनिक अमित जगताप, उमाकांत जाधव, प्रितम शिंदे, अर्जून भारूळे, गोकूळ बारी, पियुष हसवाल, गणेश भोई, राहूल चव्हाण, अमोल गोपाल, संकेत छाजेड, दिपक नेटके, अशफाख शेख, संदिप सुर्यवंशी, नवल गोपाल, मनोज चव्हाण, विपिन कावडीया इ. परिश्रम घेत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com