खासदार हेमंत गोडसेंना मिळणार 'Y' दर्जाची सुरक्षा; नाशिकच्या कार्यालयाबाहेर मोठा फौजफाटा

खासदार हेमंत गोडसेंना मिळणार 'Y' दर्जाची सुरक्षा; नाशिकच्या कार्यालयाबाहेर मोठा फौजफाटा

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिक लोकसभेचे शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांचे नाव शिंदे गटात आल्यानंतर शालीमार येथील त्यांच्या कार्यालयाच्या बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी खासदार गोडसे यांनी शिवसेनेने भाजपशी जुळवून घ्यावे असे वक्तव्य केले होते....

तेव्हापासून गोडसे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटासोबत असल्याचे बोलले जात होते. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर आहेत. काल (दि १८) झालेल्या खासदारांच्या सोबत ऑनलाईन बैठकीत एकूण १२ खासदारांनी हजेरी लावली होती. यानंतर या खादारांची नावेही समोर आली. यामध्ये खासदार गोडसे यांचे नाव अग्रस्थानी होते.

राज्यभरातून सुमारे १२ खासदार शिंदे गटात सहभागी झाल्याची चर्चा व्यक्त होत आहे. या सर्वांनी गेल्या पंधरवाड्यात मुख्यंत्री शिंदे व गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत दिल्लीत झालेल्या बैठकीला हजेरी लावल्याची चर्चा असताना, खासदारांचा हा गट आता उघडपणे शिंदेच्या समर्थनार्थ उतरला असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत शिंदे गटाच्या कार्यकारिणीची बैठक झाली. त्यास शिवसेनेच्या १२ खासदारांनी ऑनलाइन हजेरी लावली असून नाशिकचे खासदार गोडसे यांनी त्या वृत्तास दुजोरा दिला.

आपणही शिंदे गटात सहभागी होणार असून, शिवसेनेचे भले हे भाजपसोबत युती करण्यातच असल्याचा दावा गोडसे यांनी केला. आपणही या बैठकीला हजेरी लावली असून सर्व खासदारांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराला शिंदे पुढे नेत असल्याने त्यांच्यासोबत राहिले पाहिजे अशी भूमिका मांडली.

भाजपसोबतच (BJP) शिवसेनेची युती (Shivsena Alliance) रहावी, या उद्देशाने मुख्यमंत्री शिंदेच्या (Chief Minister Ekanath Shinde) उपस्थितीत झालेल्या कार्यकारिणी बैठकीत आम्ही ऑनलाइन सहभागी होतो असे शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे (Shivsena MP Hemant Godse) यांनी एका वृत्तवाहिनिली सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com