...तोपर्यंत अटक नाही, नितेश राणेंना न्यायालयाचा तात्पुरता दिलासा

...तोपर्यंत अटक नाही, नितेश राणेंना न्यायालयाचा तात्पुरता दिलासा

मुंबई | Mumbai

संतोष परब हल्ला प्रकरणात सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने (Sindhudurg District Sessions Court) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांचा अटकपूर्व जामीन नाकारला होता. आता आमदार नितेश राणे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली.

...तोपर्यंत अटक नाही, नितेश राणेंना न्यायालयाचा तात्पुरता दिलासा
सोशल मीडियावर सनी लिओनीच्या अटकेची का होतेय मागणी?

आज (मंगळवार) मुंबई उच्च न्यायालयात त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी झाली. यावेळी राज्य सरकारने ७ जानेवारीपर्यंत नितेश राणे यांच्यावर अटकेसारखी कोणतीही कठोर कारवाई करणार नाही, अशी ग्वाही न्यायालयात दिली. याप्रकरणाची पुढील सुनावणी सात जानेवारीला दुपारी 2.30 वाजता होईल. यावेळी पोलिसांकडून आपली बाजू मांडली जाईल.

...तोपर्यंत अटक नाही, नितेश राणेंना न्यायालयाचा तात्पुरता दिलासा
PHOTO : अंकिता लोखंडेचा मराठमोळा साज; नऊवारीत सौंदर्य दिसतय खुलून

दरम्यान यापूर्वी सिंधुदुर्ग सत्र न्यायालयात नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामिनाच्या सुनावणीवेळी नितेश राणे यांचे वकील संग्राम देसाई आणि सरकारी वकिलांमध्ये जोरदार युक्तिवाद झाला होता. ही सुनावणी तीन दिवस सुरु होती. या सुनावणीत सरकारी वकिलांनी संतोष परब यांच्यावरील हल्ल्याच्या कटाचे धागेदोरे नितेश यांच्यापर्यंत कसे पोहोचले आहेत, याचे सविस्तर पुरावे कॉल डिटेल्ससह न्यायालयात सादर केले होते व त्याची खातरजमा करण्यासाठी नितेश यांचे मोबाइल जप्त करण्याची गरज असल्याचे म्हणणे मांडले होते.

न्यायालयाने सरकारी पक्षाची बाजू उचलून धरत नितेश यांची कोठडीत चौकशी होण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले होते. या परिस्थितीत नितेश यांना जामीन दिल्यास तपासकामात अडथळा निर्माण होऊ शकतो, असेही मत न्यायालयाने नोंदवले नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला होता.

...तोपर्यंत अटक नाही, नितेश राणेंना न्यायालयाचा तात्पुरता दिलासा
Indian Navy Day : छत्रपती शिवाजी महाराजांना 'फादर ऑफ इंडियन नेव्ही' का म्हणतात?

काय आहे प्रकरण?

१८ डिसेंबरला संतोष परब यांच्यावर कणकवलीत हल्ला झाला होता. परब हे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे निकटवर्तीय असून करंजे गावचे माजी सरपंच आहेत. त्यांच्यावर इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी टोकदार चाकूने वार केले होते. या हल्ल्यात परब जखमी झाले होते. या प्रकरणाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकिय शत्रुत्वाची पार्श्वभूमी असल्याच्या संशयावरून पोलिसांनी भाजपच्या गोटात चौकशीची सूत्रे हलवली आहेत. मुख्य संशयित आरोपी सचिन सातपुतेला सिंधुदुर्ग ग्रामीण पोलिसांनी दिल्लीतून अटक करण्यात यश मिळवले आहे. सातपुते हा भाजप आमदार नितेश राणे यांच्या स्वाभिमानी संघटनेचा कार्यकर्ता आहे.

...तोपर्यंत अटक नाही, नितेश राणेंना न्यायालयाचा तात्पुरता दिलासा
'या' ड्रामा क्वीनची Bigg Boss च्या घरातून एक्झिट

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com