पंतप्रधानांच्या अयाेध्या दाैऱ्यास यांचा विराेध
राजकीय

पंतप्रधानांच्या अयाेध्या दाैऱ्यास यांचा विराेध

५ ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी भूमिपूजनसाठी अयोध्येत

Nilesh Jadhav

दिल्ली | Delhi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राम मंदिराच्या भूमी पूजनासाठी प्रस्तावीत असलेल्या दौऱ्याला खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी विरोध दर्शविला आहे. पंतप्रधान मोदींनी राम मंदिरासाठी अयोध्या दौरे करणे ही पंतप्रधानांच्या घटनात्मक शपथीचे उल्लंघन असल्याचे ओवेसी यांनी म्हंटले आहे. त्यांनी ट्विट करत मोदी यांच्या या दौऱ्याला विरोध दर्शवला आहे.

ओवेसी यांनी ट्विट मध्ये म्हंटले आहे, "राम मंदिराच्या भूमिपूजनामध्ये पंतप्रधानांचा सहभाग हा त्यांच्या घटनात्मक पदाच्या शपथविधीचे उल्लंघन असू शकते. धर्मनिरपेक्षता हा आपल्या राज्यघटनेचा भाग आहे. तसेच बाबरी मशिद अयोध्येमध्ये ४०० वर्षे उभी होती हे आपण विसरू शकत नाही पण १९९२ मध्ये एका गुन्हेगारी जमावाने ही मशिदी पाडली." असा आरोप देखील त्यांनी केला आहे.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com