पंतप्रधान मोदींचे मंदिर हटवले

राष्ट्रवादीचे उपरोधात्मक आंदोलन
पंतप्रधान मोदींचे मंदिर हटवले

पुणे |प्रतिनिधी| Pune

पुण्यातील (Pune) औंध (Aundh) परिसरात भारतीय जनता पार्टीचे (Bharatiya Janata Party) कार्यकर्ते मयूर मुंडे (Mayur Munde) यांनी स्वतःच्या जागेत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे मंदिर चारच दिवसांपूर्वी बांधले होते. त्यात मोदी (PM Narendra Modi) यांचा पुतळा (Statue) देखील बसवण्यात आला होता. मोदी यांच्यावरील प्रचंड प्रेमाच्या भावनेतून एक मंदिर उभारले होते यानंतर बराच वाद ही निर्माण झाला होता, पण मुंडे (Mayur Munde) यांनी काल रात्री उशिरा मोदींचा पुतळा मंदिरातून (PM Modi statue Temple) हटवला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे मंदिर उभारण्यासाठी भावना फार चांगली होती व आहे. परंतु काल भारतीय जनता पार्टीच्या (Bharatiya Janata Party) वरिष्ठ नेत्यांचा फोन आला. जिवंत व्यक्तीचे अशाप्रकारे मंदिर बांधून पूजा करणे हे भारतीय जनता पार्टीच्या (Bharatiya Janata Party) तत्वाला व विचाराला अनुसरून नसल्याची समज देण्यात आली. आपल्या मनामध्ये पंतप्रधानांबद्दल (PM) असलेल्या भावना रस्त्यावर मंदिर बांधून जाहिरापणे व्यक्त न करता त्या भावना मनातच ठेवल्या जाव्यात. त्यानुसार कृती व कार्य करावे असे सांगण्यात आले. त्यामुळे हा पुतळा स्थानिक नगरसेवक यांच्या कार्यालयात ठेवल्याचे मुंडे यांनी सांगितले. पण गेल्या चार दिवसांपासून प्रसिद्धी झोतात आलेले मुंडे (Mayur Munde) पुतळा हटवल्यानंतर माध्यमांशी सविस्तर बोलणे टाळले.

पुण्यातील पंतप्रधान नरेंद्र मोदींचे (PM Narendra Modi) हे पहिले मंदिर (Temple) होते. परंतु देशपातळीवर देखील पहिलेच मंदिर असल्याचा दावा त्यांनी केला होता. मंदिरावरुन टीका केली, तरी चालेल पण मोदींकडून आपल्याला प्रेरणा मिळते म्हणून मंदिर उभारल्याची प्रतिक्रिया मयूर मुंडे (Mayur Munde) यांनी दिली होती. मुंडे हे गेल्या 20 वर्षापासून भारतीय जनता पक्षाचे काम करतात. पंतप्रधानांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) राम मंदिर उभारले, हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून हे मंदिर उभारण्यात आल्याचे मुंडे म्हणाले होते.

भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि नमो प्रतिष्ठानचे अध्यक्ष मयुर मुंडे यांनी औंध भागातील परिहार चौकात मोदी मंदिराची उभारणी केली होती. या मंदिरात मोदी यांचा अर्धपुतळा बसविण्यात आला होता. त्यासाठी मुंडे यांनी १ लाख ६० हजार रुपयांचा खर्च केला होता. पिंपरी-चिंचवड येथील व्यावसायिक दिवांशू तिवारी यांच्या मार्फत जयपूर येथून मोदी यांचा अर्धपुतळा तयार करून आणण्यात आला होता. मयुर मुंडे यांनी मोदी यांच्या कार्यावर रचलेली कविता दर्शनी भागात लावली होती. तसंच शेजारील फलकावर मोदी यांच्या कार्याची माहिती देण्यात आली होती. मंदिराची उभारणी खासगी जागेत करण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता.

राष्ट्रवादीचे उपरोधात्मक आंदोलन

दरम्यान, मोदी यांचा पुतळा काल रात्री हटवण्यात आल्यानंतरही गुरुवार राष्ट्रवादीच्या वतीने याठिकाणी उपरोधात्मक आंदोलन करण्यात आले. सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसने या ठिकाणी पंतप्रधान मोदींच्या नावाची आरती म्हणून मोदींचं मंदिर उभारण्याच्या या कृत्याचा निषेध केला. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष नगरसेवक प्रशांत जगताप यांनी भाजपावर कठोर शब्दात टीका केली. हे मंदिर उभारल्याने पुण्यातील सर्व प्रश्न सुटणार आहेत असा गाजावाजा पुणे भाजपाने केल्याचा आरोप जगताप यांनी केला. तसेच हे मंदिर उभारणाऱ्या मयुर मुंडेचा उल्लेख जगताप यांनी ‘एक अंधभक्त, माथेफिरु’ असा केला.

प्रसारमाध्यमांशी बोलताना जगताप यांनी भाजपावर टीका केली. “चार दिवसांपूर्वी येथील एका अंधभक्ताने, माथेफिरुने नरेंद्र मोदी नावाच्या देवाचं मंदिर निर्माण केलं होतं. चार दिवसांमध्ये पुण्यातील भाजपाने असं चित्र निर्माण केलेलं की नरेंद्र मोदी नावाचे देव पुण्यात अवतरलेत. ते आल्यानंतर पुण्यातील प्रश्न आता संपणार आहेत. पुण्यात रुपयाने पेट्रोल, ४० रुपयांनी डिझेल. २०० रुपयांनी सिलेंडर मिळणार आहे. महागाई संपणार, रस्ते चकाचक होणार, कचरामुक्त पुणे होणार असं चित्र निर्माण करण्यात आलं,” असा उपरोधिक टोला जगताप यांनी लगावला.

मोदी नावाच्या या देवाला पेट्रोल, गॅस, डिझेल हा नैवद्य आवडतो, तो सुद्धा आम्ही घेऊन आलेलो. १९४७ ला देश स्वतंत्र झाल्यापासून २०१४ पर्यंत या नैवद्याचे दर मर्यादित होते. मात्र या देवाला हे खाद्य इतकं आवडतं की त्याने याचे दर वाढवून ठेवलेत. हा नैवद्य दाखवण्याआधीच देव चोरीला गेला. देव रुसून गेलाय. या पुणे शहराचे प्रश्न सोडवण्याची ताकद या देवात नाहीय, असंही जगताप म्हणाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com