पंतप्रधान मोदींच्या भाषणाची सुरूवात मराठीतून; शिंदे-फडणवीस सरकारचं कौतुक

पंतप्रधान मोदींच्या भाषणाची सुरूवात मराठीतून; शिंदे-फडणवीस सरकारचं कौतुक

नागपूर | Nagpur

राज्यातील विविध प्रकल्पांच्या ७५ हजार कोटींच्या प्रकल्पांचं उदघाटन आणि लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नागपुरात करण्यात आलं. मोदींनी यावेळी नागपूरकरांना संबोधित करताना आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून केली आणि विशेषत: आजच्या संकष्टी चतुर्थीचा आवर्जुन उल्लेख केला.

महाराष्ट्राच्या विकासाच्या अकरा ताऱ्यांचं 'नक्षत्र'

मराठीतून भाषणाला सुरुवात करत मोदी म्हणाले, "आज संकष्टी चतुर्थी आहे. कोणतेही शुभकार्य करताना आपण पहिल्यांदा गणेश पूजन करतो. आज आपण नागपुरात आहोत तर टेकडीच्या गणपतीला माझं वंदन" ११ डिसेंबरचा आजचा दिवस संकष्ट चतुर्थीचा पवित्र दिवस आहे. आज महाराष्ट्राच्या विकासासाठी ११ सिताऱ्यांचे महान नक्षत्राचा उदय होत आहे. पहिला तारा हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग. दुसरा तारा नागपूर एम्स आहे, ज्याचा लाभ विदर्भातील मोठ्या भागातील लोकांना होईल. तिसरा तारा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वन हेल्थची स्थापना आहे. चौथा तारा रक्तासंदर्भातील रोगांच्या नियंत्रणासाठी चंद्रपुरात बनलेलं आयसीएमआरचं रिसर्च सेंटर, पाचवा तारा पेट्रोकेमिकल क्षेत्रासाठी खूपच महत्वाचा सीपेट चंद्रपूर. सहावा तारा नागपुरात नाग नदीचं प्रदुषण कमी करण्यासाठी सुरु झालेला प्रकल्प, सातवा तारा नागपूरमध्ये मेट्रो फेज वनचा लोकार्पण आणि दुसऱ्या फेजचं भूमिपूजन. आठवा प्रकल्प नागपूर-बिलासपूर वंदे भारत एक्स्प्रेस, नववा तारा नागपूर-अजनी रेल्वे स्टेशनचा विकास प्रकल्प, दहावा तारा अजनीमध्ये बारा हजार हॉर्सपॉवरच्या इंजिनाच्या देखभाल प्रकल्प, बारावा तारा नागपूर-इटारसी लाईनवर कोली नरके मार्गाचं लोकार्पण आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com