
दिल्ली | Delhi
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवीन संसद भवनाचे उद्धाटन करण्यात आले आहे. या उद्धाटनाला साधु,संत आणि महत्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर देशातील विरोधी पक्षानी या उद्धाटन कार्यक्रमावर बहिष्कार टाकला होता.
राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते नवीन संसद भवनाचे उद्धाटन व्हावे अशी विरोधी पक्षाची मागणी होती. याचदरम्यान काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली आहे. त्यांनी ट्विट करत अवघ्या दोन ओळीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली आहे.
'संसद लोकांचा आवाज आहे. पंतप्रधान संसद भवनाच्या उद्घाटनाला राज्याभिषेक समजत आहेत.', अशा शब्दात ट्वीट करत राहुल गांधींनी मोदींवर निशाणा साधला. काँग्रेसने या कार्यक्रमला आधीच विरोध करत बहिष्कार टाकला होता. या कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यात आले नसल्याचा दावा करत अनेक विरोध पक्षांनी कार्यक्रमाला हजेरी न लावण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे यावरून देशातील राजकारण तापले आहे.
दरम्यान आजचा संसदेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पाहून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी टीका केली आहे. मी सकाळी संसद भवनाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पाहिला. हा कार्यक्रम पाहिल्यानंतर मी या कार्यक्रमाला गेलो नाही याचं मला समाधान वाटलं. उद्घाटनावेळी जे कर्मकांड सूरू होतं, त्यावरून असं वाटतं की नेहरूंनी जी आधुनिक लोकशाहीची संकल्पना मांडली होती, त्या संकल्पनेपासून देश मागे जात असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे.