पंतप्रधान मोदींनी विरोधकांच्या भ्रष्टाचाराची यादीच दाखवली वाचून; राष्ट्रवादीवरही केला गंभीर आरोप

पंतप्रधान मोदींनी विरोधकांच्या भ्रष्टाचाराची यादीच दाखवली वाचून; राष्ट्रवादीवरही केला गंभीर आरोप

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

भाजपच्या (BJP) 10 लाख कार्यकर्त्यांना आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) संबोधित केले. यात त्यांनी पाटणा येथे झालेल्या विरोधी पक्षांची बैठकीवर जोरदार प्रहार केला. तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी, आरजेडी, टीएमसी यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचारांची यादी वाचून दाखवली...

ते म्हणाले की, 'हल्ली वारंवार गॅरंटी हा शब्द वापरला जातो, हे सगळे विरोधी पक्षनेते, हे लोक भ्रष्टाचाराची गॅरंटी आहे. लाखो-करोडो रुपयांच्या भ्रष्टाचाराची ही गॅरंटी आहे. काही दिवसांपूर्वी यांनी एकत्र फोटो काढले. या फोटोमध्ये असलेल्या सगळ्यांची टोटल केली तर 20 लाख कोटी रुपयांच्या घोटाळ्याची गॅरंटी आहे, असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) केली.

'काँग्रेसचा (Congress) एकट्याचाच घोटाळा लाखो-करोडोंचा आहे. 1 लाख 86 हजार कोटींचा कोळसा घोटाळा, 1 लाख 76 हजार कोटींचा टूजी घोटाळा, 70 हजार कोटींचा कॉमनवेल्थ घोटाळा, 10 हजार कोटींचा मनरेगा घोटाळा, हेलिकॉप्टर सबमरीनपासून असे कोणतेही क्षेत्र नाही, जिकडे काँग्रेसने घोटाळा केला नाही,' असा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला.

पंतप्रधान मोदींनी विरोधकांच्या भ्रष्टाचाराची यादीच दाखवली वाचून; राष्ट्रवादीवरही केला गंभीर आरोप
के चंद्रशेखर राव यांचा महाराष्ट्रातील नेत्यांवर निशाणा; म्हणाले...

ते पुढे म्हणाले की, आरजेडीवर हजारो कोटींच्या घोटाळ्याचा आरोप आहे. चारा घोटाळा, अलकतारा घोटाळा, पूर राहत घोटाळा, आरजेडीच्या घोटाळ्यांची यादी एवढी मोठी आहे की कोर्टही थकली. एका पाठोपाठ एक शिक्षा दिल्या जात आहेत.

डीएमकेवर अवैध पद्धतीने सव्वा लाख कोटी रुपयांची संपत्ती बनवण्याचा आरोप, टीएमसीवर 23 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप, रोझवॅली, शारदा घोटाळा, गोतस्करी घोटाळा, कोळसा तस्करी घोटाळा, बंगालची लोक हे घोटाळे विसरू शकत नाहीत. राष्ट्रवादीवरही 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप आहे. या पक्षांच्या घोटाळ्यांचे मीटर कधी डाऊनच होत नाही, असा घणाघात त्यांनी केला.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

पंतप्रधान मोदींनी विरोधकांच्या भ्रष्टाचाराची यादीच दाखवली वाचून; राष्ट्रवादीवरही केला गंभीर आरोप
के चंद्रशेखर राव यांच्या 'त्या' टीकेला मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर; म्हणाले, आधी तुमचा...
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com