उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात फोनवरून चर्चा; काय झाला संवाद?

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात फोनवरून चर्चा; काय झाला संवाद?

मुंबई | Mumbai

शिवसेना (Shivsena) नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) शिवसेनेच्या अनेक आमदारांसह सूरतमध्ये आहेत. ते सूरतमधील मेरिडेयन हॉटेलमध्ये आहेत. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेले बंड शमवण्यासाठी शिवसेनेतर्फे (Shivsena) प्रयत्न केले जात आहेत...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरून शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) आणि रविंद्र फाटक (Ravindra Phatak) यांनी सूरतमध्ये एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यांची बैठक नुकतीच संपली आहें. ही बैठक सुमारे एक तास चालली. या बैठकीत एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात फोनवरून चर्चा झाल्याचे समजते.

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात फोनवरून चर्चा; काय झाला संवाद?
मी राजीनामा देतो तुम्हीच...; मुख्यमंत्र्यांची एकनाथ शिंदेंना मोठी ऑफर

फोनवरून झालेल्या चर्चेत शिवसेनेत पुन्हा परतण्याचा प्रस्ताव उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी एकनाथ शिंदेसमोर (Eknath Shinde) ठेवला. मात्र शिंदे यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावल्याची माहिती मिळत आहे. तसेच मी कुठलीही पक्षविरोधी कारवाई केली नाही, तरीही मला गटनेते पदावरून का काढले. असे एकनाथ शिंदे बोलल्याचे समजते.

दरम्यान, या बैठकीत मिलिंद नार्वेकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या प्रस्तावावर एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा केली. मात्र एकनाथ शिंदे यांनी नार्वेकर यांच्यासमोर काही ठेवल्या आहेत. भाजपसोबत गेल्यास शिवसेनेतच राहणार, काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी आघाडी तोडावी लागेल.

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात फोनवरून चर्चा; काय झाला संवाद?
आज सायंकाळी एकनाथ शिंदे करू शकतात शिवसेनेला 'जय महाराष्ट्र'

काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर आमदारांची नाराजी आहे. भाजपसोबत (BJP) शिवसेनेने सरकार स्थापन करण्याची मागणी यावेळी एकनाथ शिंदे यांनी केल्याची माहिती मिळत आहे. आता या भेटीनंतर काय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात फोनवरून चर्चा; काय झाला संवाद?
वर्षावरील बैठकीत 'इतके' आमदार होते उपस्थित; काय झाला निर्णय?

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com