Wednesday, April 24, 2024
Homeराजकीयसात वर्षात लोकांचे प्रचंड हाल

सात वर्षात लोकांचे प्रचंड हाल

मुंबई |प्रतिनिधी

गेल्या सात वर्षात केंद्र सरकारने नोटाबंदी केली. जीएसटी लागू करण्यात आला. कोरोनासारखे संकट हाताळता आले नाही.लोकांचे प्रचंड हाल झाले, बेरोजगारी वाढली, नोकर्‍या गेल्या, लोक जीव गमावत आहेत. तरीही भाजप सरकारची ७ वर्ष साजरी करणार होती,अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी रविवारी केली.

- Advertisement -

येत्या २६ मे रोजी केंद्रातील भाजप सरकारला ७ वर्ष पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर गेल्या सात वर्षाच्या भाजपच्या कारभारावर नवाब मलिक यांनी जोरदार हल्लाबोल केला.

देशात भाजपचे सरकार आहे. मात्र ते मोदी सरकार म्हणून ओळखले जाते आहे. या सरकारला सात वर्षे पूर्ण झाल्याबद्दल भाजपचे लोक उत्सव साजरा करणार होते. मात्र राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी.नड्डा यांनी उत्सव साजरा करु नका, असा आदेश काढला आहे. ही सत्य परिस्थिती आहे, असेही नवाब मलिक म्हणाले.

दरम्यान, नदीमध्ये मृतदेह सोडणे, ऑक्सिजन अभावी लोकांचा मृत्यू होणे, औषधांचा तुटवडा, देशात लस उपलब्ध नसताना लस देण्याचा कार्यक्रम जाहीर करणे हे इंडियन मॉडेल कोणच स्वीकारणार नाही, अशा शब्दात नवाब मलिक यांनी मोदींच्या इंडियन मॉडेलचा समाचार घेतला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या