मविआने पैसे देऊन मोर्चासाठी लोक जमवले?

व्हिडीओ शेअर करत भाजपचा आरोप
मविआने पैसे देऊन मोर्चासाठी लोक जमवले?

मुंबई | Mumbai

महापुरुषांविषयी करण्यात आलेली वादग्रस्त विधानं, महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न आणि राज्यातून बाहेर चाललेले उद्योग या सगळ्याचा निषेध करण्यासाठी काल (शनिवार) मुंबईत महाविकास आघाडीकडून महामोर्चा काढण्यात आला.

या मोर्चात तीनही पक्षाचे हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते. याशिवाय महाविकास आघाडीचे अनेक आघाडीचे नेते मोर्चात होते. दरम्यान या मोर्चात पैसे वाटप झाल्याचा आरोप भाजपने केलाय. भाजपने या पैसे वाटपाचा एक व्हीडिओ ट्विट केलाय.

केशव उपाध्ये यांनी एक व्हिडिओ शेयर करत म्हटलं आहे की, मुंबईतील पत्रकार संघाच्या जवळ असलेल्या कॉंग्रेस कार्यालयाजवळ आज मोर्चा सुरू असतानाचे दृश्य. आज मविआ मोर्चात थोडीफार लोक जमली ती सुध्दा अशा पध्दतीने, असं म्हणत त्यांनी मविआवर टीका केली आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com