Tuesday, April 23, 2024
Homeमुख्य बातम्याएकनाथ शिंदेंचे भाषण सुरु अन् लोकांचा BKC ला 'जय महाराष्ट्र', व्हिडीओ व्हायरल

एकनाथ शिंदेंचे भाषण सुरु अन् लोकांचा BKC ला ‘जय महाराष्ट्र’, व्हिडीओ व्हायरल

मुंबई | Mumbai

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर पार पडला. मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या भाषणात प्रामुख्याने उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली…

- Advertisement -

रात्री साडेआठच्या आसपास मुख्यमंत्री शिंदे यांनी भाषणाला सुरुवात केली. त्यांचे भाषण जवळजवळ दीड तास सुरु होते. मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान बीकेसीच्या मैदानामध्ये सभेसाठी जमलेला जमाव हळूहळू सभास्थळावरुन निघून जाताना दिसून आले.

मुख्यमंत्री शिंदे हे सभास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांचे व्यासपीठावर आगमन होताच, उपस्थित जनसमुदायाने टाळय़ांचा कडकडाट करत शिंदे साहेब आगे बढो, शिवसेना जिंदाबादच्या जयघोषात त्यांचे स्वागत केले. यावेळी शिंदे यांना १२ फूट लांबीची चांदीची तलवार भेट देण्यात आली.

या स्वागतानंतर आपल्या दीड तासाच्या भाषणात शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडत त्यांच्या हिंदूत्त्वाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे केले. राज्यभरातून आलेल्या लाखो शिवसैनिकांसमोर प्रारंभीच नतमस्तक होत शिंदे यांनी अभिवादन केले.

ऐकून कंटाळा आला, त्यांनी आपला स्क्रिप्टरायटर…; फडणवीसांचा ठाकरेंना टोला

मात्र मुख्यमंत्री शिंदेंचं भाषण फारच लांबले. मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरु असतानाच लोक निघून जात असल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. दरम्यान, दुसरीकडे शिवाजी पार्कवर माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अवघ्या पाऊण तासामध्ये म्हणजेच शिंदे यांनी दिलेल्या भाषणाच्या अर्ध्या वेळात भाषण केल्याचे पहायला मिळाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या