Pegasus Spyware : ‘पेगॅसस’ हेरगिरीमध्ये मोदी सरकार नाही तर मग कोण?

भाजपा खासदार सुब्रहमण्यम स्वामी यांचा थेट सवाल
Pegasus Spyware : ‘पेगॅसस’ हेरगिरीमध्ये मोदी सरकार नाही तर मग कोण?

दिल्ली l Delhi

पेगासस हेरगिरीवरून (Project Pegasus) देशात राजकीय वादळ निर्माण झाले आहे. पेगॅसस हेरगिरी तंत्रज्ञान वापरुन जगभरातील अनेक देशांतील सरकारांनी आपल्याच देशातील काही महत्त्वाच्या व्यक्तिमत्वांवर पाळत ठेवल्याचे पुढे आले आहे.

यात भारतातीलही काही महत्वाचे राजकीय नेते, पत्रकार आणि इतर लोकांवर पाळत ठेवल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. भारत सरकारनेच ही पाळत ठेवल्याचा आरोप आहे. विरोधकांनी या प्रकरणावरुन सरकारवर टीकेची झोड उडवली असतानाच एका भाजप खासदार सुब्रहमण्यम स्वामी (BJP MP Subramanian Swamy) यांनीही केंद्र सरकारवर प्रश्न उपस्थित केला आहे.

सुब्रहमण्यम स्वामी यांनी ट्वीट केलं असून यावेळी त्यांनी जर यामागे भारत सरकार नाही तर मग कोण आहे? अशी विचारणा केली आहे. 'पेगॅसस स्पायवेअर ही एक व्यावसायिक कंपनी असून कंत्राट दिल्यानुसार काम करते हे स्पष्ट आहे. त्यामुळे भारतातील ऑपरेशनसाठी त्यांना पैसे कोणी दिले हा महत्वाचा प्रश्न आहे. जर भारत सरकार नाही तर मग कोण? भारतातील जनतेला सांगणं हे भारत सरकारचं करत्तव्य आहे,' असं सुब्रहमण्यम स्वामी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विट करून पेगासस स्पायवेअर प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले की, जागतिकस्तरावर भारताला अपमानित करण्याचा काही वर्गांकडून प्रोत्साह दिले जात आहे. त्याबाबत आम्ही सायंकाळी रिपोर्ट पाहिला आहे. विध्वंस करणाऱ्या कटाच्या माध्यमातून भारताचा विकास हा रुळावरून घसरणार नाही. पावसाळी अधिवेशन विकासाचा नवा मापदंड करेल, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com