sharad pawar and parth pawar
sharad pawar and parth pawar
राजकीय

पवारांच्या घरातील भांड का वाजतं?

पार्थ पवारांमुळे कुटुंबातील वादाची पुन्हा चर्चा

Anant Patil

अहमदनगर/मुंबई | Mumbai- राजकीय कुटुंबात आपसातील वाद नवे नाहीत. मात्र राज्यातील पॉवरफुल्ल घराणे असलेल्या बारामतीच्या पवारांच्या राजकीय वाड्यात अलिकडे आदळआपट वाढल्याने रोज नवी चर्चा फुटत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे चिरंजीव पार्थ पवार (Parth Pawar) यांनी सुशांतसिंग (Sushant Singh Rajput) प्रकरणी केलेली सीबीआय चौकशीची मागणी आणि यावरून ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी त्यांना फटकारणे, हे पवार कुटुंबातील धुसफूस वाढल्याचे चिन्ह आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आजोबा-नातवातील हा वाद सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

पवार कुटुंबातील वादाची चर्चा

गेल्या काही वर्षापासून सुरू आहे. मध्यंतरी अजित पवारांच्या बंडखोरीचा अंकही घडून गेला. त्यानंतरही अनेकदा सर्व आलबेल नसल्याचे वारंवार चर्चिले गेले. आता तर आजोबांची आणि पक्षाची ( NCP ) एक भुमिका आणि नातवाची दुसरी भुमिका, यामुळे हा वाद अधिक चर्चेत आला आहे. पार्थ पवार यांचा राजकीय वकुब लोकसभा निवडणूकीत उडघ झाला होता. त्यानंत अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीनंतर बंडखोरी करत राष्ट्रवादी आणि शरद पवार यांना धक्का दिला. त्यातून सावरत पक्षाने राज्यात सत्ता स्थापन केली.

पक्षातील वर्चस्वावरून

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) , खा.सुप्रिया सुळे (Supriya Sule) , ना.जयंत पाटील ( Jayant Patil) , आ.रोहित पवार ( Rohit Pawar) अशी नावे घेत वेगवेगळ्या चर्चा सुरूच होत्या. त्यात आता पार्थ यांच्या नव्या मागणीमुळे वादाला नवी फोडणी मिळाली.

पार्थ यांच्या मागणीनंतर

‘ते अपरिपक्व आहेत. त्यांच्या मागणीला कवडीची किंमत देत नाही’ असे शरद पवार यांनी म्हटले होते. संयमासाठी ओळखले जाणारे ज्येष्ठ नेते पवार यांनी कडक शब्दात पार्थ यांचे कान टोचल्याने दोन दिवसांपासून पुन्हा एकदा राजकीय चर्चेने जोर पकडला आहे.

पवार कुटुंबियांवर निशाणा

याच काळात अन्य राजकीय नेत्यांनी रोज समोर येणारी वक्तव्य वाद अधिक रंगवत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने शरद पवार यांची भेट घेतली. वाद उपस्थित झाल्यावरही पार्थ यांनी अद्याप प्रतिक्रीया देणे टाळले आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षातून पार्थ यांची बाजू घेत पवार कुटुंबियांवर निशाणा साधणे सुरू झाले आहे. त्याचसोबत राष्ट्रवादीतील नेतेही कोणताही कौटुंबिक वाद नाही, असे वारंवार सांगत आहेत.

नया है वह

ना.छगन भुजबळ यांनीही वाद नसल्याचे सांगत पार्थ यांचे वर्णन ‘नया है वह’ असे केले. तर अन्य पक्षात गेलेल्या पवार कुटुंबाच्या नातेवाईकांमधून विशेषत: सुनेत्रा पवार यांच्या नातेवाईकांकडून पार्थ यांची पाठराखण सुरू झाल्याने हे प्रकरण पुन्हा गंभीर वळणावर जाणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com