VIDEO : शरद पवार हेच पत्राचाळ प्रकरणाचे रिंग मास्टर; भाजप नेत्याचा गंभीर आरोप

शरद पवार
शरद पवार

मुंबई | Mumbai

पत्राचाळ घोटाळाप्रकरणी ( Patra Chawl Scam Case) ईडीनं (ED) ४ हजार पानी आरोपपत्र दाखल केलं आहे. यामध्ये शिवसेनेचे (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना दोषी ठरवण्यात आलं आहे.

मात्र, यानंतर आता भाजपने (BJP) पत्राचाळ प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर गंभीर आरोप करत, पत्राचाळ प्रकरणी त्यांची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे.

भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना एक पत्र दिले आहे.

केंद्रात कृषी मंत्री असताना शरद पवार यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पत्राचाळीचा विकासक ठरवण्यासाठी बैठका घेत होते. शरद पवार हेच पत्राचाळ प्रकरणाचे रिंग मास्टर असून, त्यांच्या भूमिकेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी अतुल भातखळकर यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com