संजय राऊतांचा कोठडीतील मुक्काम वाढला

संजय राऊतांचा कोठडीतील मुक्काम वाढला

मुंबई | Mumbai

शिवसेना (Shivsena) नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची न्यायालयीन कोठडी (judicial custody) पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे. संजय राऊतांची १९ सप्टेंबरपर्यंत कोठडी वाढवण्यात आली आहे.

गोरेगावच्या पत्रा चाळ पुनर्विकास प्रकरणी झालेल्या गैरव्यवहारात (Patra Chawl land scam case) राऊत यांना ईडीकडून (ED) १ ऑगस्टला रात्री उशिरा अटक करण्यात आली होती. त्यांच्या भांडुपच्या निवासस्थानी तब्बल साडे नऊ आणि त्यानंतर ईडी कार्यालयात ८ तास कसून चौकशी केल्यानंतर त्यांना अटक झाली होती.

सुरूवातीला संजय राऊतांना ४-४ दिवसांची ईडी कोठडी देण्यात आली होती. तर ८ ऑगस्टला त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. आज कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले आणि त्यांना १९ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीतच ठेवण्याचे आदेश दिले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com