Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्याSanjay Raut : संजय राऊत तुरुंगाबाहेर येणार? जामीनावर आज फैसला

Sanjay Raut : संजय राऊत तुरुंगाबाहेर येणार? जामीनावर आज फैसला

मुंबई | Mumbai

ठाकरे सरकारच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात शिवसेनेची बाजू भक्कमपणे मांडणारे खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज (बुधवार) सुनावणी होणार आहे.

- Advertisement -

संजय राऊत हे सध्या पत्राचाळ घोटाळा प्रकरणात तुरुंगात आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्याकडून जामिनासाठी प्रयत्न सुरु आहेत. मात्र, अद्याप पीएमएलए कोर्टाने त्यांना दिलासा दिलेला नाही. त्यामुळे आजच्या सुनावणीत काय घडणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

संजय राऊत यांच्या जामीन अर्जावरील मागील सुनावणी २ नोव्हेंबर रोजी पार पडली होती. यावेळी राऊतांच्या जामिनासंदर्भात ईडीनं आपलं लेखी उत्तर न्यायालयात सादर केलं. त्यानंतर न्यायालयानं जामीनावरील आपला निकाल राखून ठेवला होता. आज यावर सुनावणी होणार असून न्यायालय निकाल देणार आहे.

मुंबईतील पत्राचाळ घोटाळा प्रकरणी खासदार संजय राऊत आणि प्रविण राऊत दोघेही न्यायालयीन कोठडीत आहेत. प्रविण राऊत आणि संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज एकाच दिवशी निकाल देण्यात येणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या