Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यापारनेर तहसीलदारांच्या 'त्या' ऑडिओ क्लिपवरुन भाजपा आक्रमक

पारनेर तहसीलदारांच्या ‘त्या’ ऑडिओ क्लिपवरुन भाजपा आक्रमक

अहमदनगर | Ahmednagar

पारनेर तहसीलदार ज्योती देवरे यांनी ऑडिओ क्लिप (Parner Tehsildar Jyoti Deore audio clip) तयार करून आत्महत्येचा (Sucide) इशारा दिला आहे. या क्लिपमुळे पारनेर (Parner) तालुक्यासह राज्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान या प्रकरणी भाजप आक्रमक झाली असून माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना पत्र लिहले आहे तर भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra wagh) यांनी ठाकरे सरकार आणि स्थानिक आमदार निलेश लंके यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे.

- Advertisement -

Video : पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांचा आत्महत्येचा इशारा..; आमदार लंकेंकडे बोट?

पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची ऑडिओ क्लिप ऐकली आणि मन सुन्न झालं, असं चित्रा वाघ यांनी म्हटलंय. ‘सत्तेतले हे बेलगाम घोडे…देवमाणूस म्हणून मिरवणार्या पारनेरच्या या लोकप्रतिनीधीच्या नाकात वेसणं घालायचं काम महिला सशक्तीकरणाच्या बाता मारणार्यांकडून होतयं का तेचं आता पहायचयं’, अशा शब्दात चित्रा वाघ यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. तिथल्या लोकप्रतिनिधीच्या जाचाला कंटाळून त्यांनी आत्महत्येचा इशारा दिलाय. वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केलेल्या दिपाली चव्हाण यांना उद्देशून त्यांनी एक पत्र लिहिलं आहे आणि त्यांनी म्हटलंय की मी ही तुझ्याकडे लवकरच येतेय. त्यात त्यांनी प्रशासनाकडून कसा छळ होतो, लोकप्रतिनिधी कसे त्रास देतात, वरिष्ठ त्यांना कसे पाठिशी घालतात याचं दाहक वास्तव त्यांनी उभं केलंय. मध्येच त्या हमसून हमसून रडतानाही दिसत आहेत आणि हिच माझी सुसाईड नोट समजा असंही त्यांनी त्या पत्रात म्हटलंय. खरं तर सुसाईड नोटमध्ये सगळ्यांची नावं लिहून ठेवायची आणि कोर्टात ती खोटी ठरली तर? हिरा बनसोडेसारखं फिर्याद कुणाकडे मागायची? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलाय.

तात्काळ कारवाई करा; देवेंद्र फडणवीसांनी लिहिलं मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र

या प्रकरणाची तातडीने दखल मुख्यमंत्र्यांनी घ्यावी आणि त्यांचे म्हणणे प्रत्यक्ष ऐकून घेत त्यांना न्याय द्यावा अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना पत्र पाठवून केली आहे. मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात देवेंद्र फडणवीस म्हणतात की, नगर जिल्ह्यातील पारनेरच्या तहसिलदार ज्योती देवरे यांनी ११ मिनिटांची एक ऑडिओ क्लिप जारी करून अनेक गंभीर आरोप स्थानिक लोकप्रतिनिधीवर आणि वरिष्ठ अधिकार्‍यांवर केले आहेत. लसीकरणावरून काही कर्मचार्‍यांना पोलिस अधिकार्‍यांच्या समोर मारहाण करणे, अश्लील शिविगाळ करणे, महिला कर्मचार्‍यांना मारण्यासाठी महिला पोलिसांना बोलाविण्यास सांगणे, जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस अधीक्षकांपर्यंत प्रकरण नेल्यानंतर तहसिलदार ज्योती देवरे यांच्याच बदनामीचा प्रयत्न करणे, वरिष्ठ अधिकार्‍यांकडूनही त्यांना धमक्या प्राप्त होणे, कोरोना काळात नियमांचे पालन करण्याचा प्रयत्न करीत असताना त्यातही अडचणी उत्पन्न करणे आणि मग थेट मंत्र्यांकडे त्यांच्या बदलीची शिफारस करणे, यातून महिला अधिकार्‍यांचे खच्चीकरण करणे, असे अनेक गंभीर आरोप त्यांनी केले असल्याचं फडणवीस यांनी सांगितले आहे.

ज्योती देवरे आपल्या क्लिपमध्ये म्हणतात..

प्रिय दीपाली चव्हाण घाबरु नकोस मी लवकरच तुझ्या वाटेवर तुला सोबत करण्यासाठी येत आहे. त्याशिवाय दुसरा मार्गच दिसत नाही. तुझ्या वाटेवर दिसते एक आशेची उजळलेली पणती बाकी सारा अंधार दिव्याखालचा. खर तर तु या रस्त्यावरुन गेली तेव्हा मी सूसाईट नोट लिहून रडत कुढत जगणाऱ्या साऱ्या मैत्रिणींना हक्कानं खडसावले होतं, फुलराणी बना तुला शिकवीन चांगला धडा असे पालुपद गा मी पण तेच पालूपद गात होते. पण लक्षात आले त्याचे परिणाम. किती जणांना धडा शिकवायचा पण या चिमुकल्या पंख्यात आता त्राण राहिले नाही.

तत्वांना मुरड घालून जगता येत नाही. त्यांचे हुजरी करत तळवे चाटता येत नाही. लोकप्रतिनिधींच्या तालावर नाचता येत नाही, त्यांनी थूंकलेलं मला चाटत येत नाही. उकिरड्यावर उभ्या असलेल्या त्यांच्या कार्यकर्त्यांच्या धिंडी मला रोखता येत नाही. अन् वरिष्ठांना सांगूनही त्यांना खिंडित गाठता येत नाही. त्यांनी तर खिंडित साहाय्य पोहचविण्याऐवजी मारेकरी पोहचविण्याचे काम केलं. ठिक आहे लोकप्रतिनिधी आणि आपण एक रथ आणि दोन चाक. पण आपल्या चाकांना जरा गती घेतली की आपला घात निश्चित समजावा.

- Advertisment -

ताज्या बातम्या