Monday, April 29, 2024
Homeराजकीयपारनेरची जबाबदारी कर्डिलेंवर शेवगावची धुरा पाचपुतेंकडे

पारनेरची जबाबदारी कर्डिलेंवर शेवगावची धुरा पाचपुतेंकडे

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

आगामी काळात होणार्‍या जिल्ह्यातील नगर परिषद, नगर पंचायत निवडणुकीसाठी भाजपने आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

- Advertisement -

या निवडणुकांची जबाबदारी आ. बबनराव पाचपुते, माजी आ. शिवाजी कर्डिले, माजी आ. बाळासाहेब मुरकुटे, नगरचे माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. अभय आगकर यांच्या खांद्यावर सोपविण्यात आली असून या सर्व ठिकाणी भाजप यशस्वी होईल, असा विश्वास जिल्हाध्यक्ष अरूण मुंढे यांनी व्यक्त केला आहे.

पुढील वर्षी पारनेर, कर्जत येथे नगर पंचायत तर जामखेड, शेवगावमध्ये नगर परिषद निवडणूक होणार आहे. यासाठी भाजप जिल्हाध्यक्ष मुंढे यांनी निवडणूक प्रभारींच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. यात पारनेरची जबाबदारी माजी आ. कर्डीले, शेवगावची धुरा आ. पाचपुते, कर्जतची जबाबदारी माजी आ. मुरकुटे तर जामखेडसाठी माजी नगराध्यक्ष अ‍ॅड.आगरकर यांच्याकडे निवडणुकीचे नेतृत्व देण्यात आले आहेत.

जिल्हाध्यक्ष मुंढे यांनी नियुक्त पत्रात गेल्या पाच वर्षात शेवगाव आणि कर्जत-जामखेडमध्ये भाजपची सत्ता होती. ही सत्ता कायम राखण्यासोबतच पारनेरमध्ये कमळ फुलविण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. यासाठी निवडणूक प्रभारी यांनी जामाने कामाला लागण्याच्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत.

विशेष म्हणजे या सर्व निवडणूका नगर दक्षिणेत होणार आहेत. यासाठी भाजपने आजी-माजी आमदार नियुक्त केले असले तरी दक्षिणेत तीन वेळा खासदार असलेल्या दिलीप गांधी यांना मात्र संघटनेने जबाबदारी सोपवली नसल्याने भाजपच्या गोटातून आर्श्चय व्यक्त होत आहे. आता गांधी या भूमिका घेतात याकडे जिल्ह्याचे लक्ष आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या