Parliament Monsoon Session : TMC चे खासदार शांतनू सेन निलंबित

का केली कारवाई?
Parliament Monsoon Session : TMC चे खासदार शांतनू सेन निलंबित

दिल्ली | Delhi

संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे (Parliament Monsoon Session 2021). या अधिवेशनात जनसामान्यांच्या प्रश्नांवर चर्चा होण्याऐवजी विरोधकांच्या गोंधळाचीच चर्चा जास्त होत आहे. तृणमूल काँग्रेसचे खासदार शांतनू सेन (TMC MP Santanu Sen) यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू (Chairman M. Venkaiah Naidu) यांनी शांतनू सेन यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. यामुळे शांतनू सेन अधिवेशनाला मुकणार आहेत.

शांतनू सेन यांनी गुरुवारी केंद्रीय माहिती व तंत्रज्ञानमंत्री अश्विनी वैष्णव (IT Minister Ashwani Vaishnaw) पेगॅसस प्रकरणावर (Pegasus snooping row) निवेदन देत असताना त्यांच्या हातातून निवेदनपत्र खेचून घेत फाडलं होतं. यानंतर भाजपाने शांतनू सेन यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणण्याची तयारी केली होती. दरम्यान व्यंकय्या नायडू यांनी शांतनू सेन यांचं निलंबन केलं आहे.

संसदेतील पावसाळी अधिवेशनात गुरुवारी पेगॅसस प्रकरणावरून जोरदार गोंधळ झाला. केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव हेरगिरी प्रकरणावरून राज्यसभेत बाजू मांडण्यास उभे राहिले. तेव्हा विरोधी पक्षातील खासदारांनी त्यांना बोलू दिले नाही. वैष्णव सरकारची बाजू मांडत असताना तृणमूल काँग्रेसचे खासदार पुढे सरसावले आणि त्यांनी मंत्र्यांच्या् हातून पेपर खेचून घेतले आणि फाडून टाकला. त्यामुळे राज्यसभेत एकच गोंधळ उडाला. गोंधळामुळे मंत्री अश्विनी वैष्णव यांना बोलताही आले नाही. गोंधळामुळे राज्यसभेचे कामकाज स्थगित करण्यात आले होते .

शांतनु सेन व्यवसायाने डॉक्टर असून ते इंडियन मेडिकल असोशिएशनचे (IMA) अध्यक्षही होते. ते उत्तर कोलकातामधील आहेत. २०१६ मध्ये तृणमूल काँग्रसकडून त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र, त्यात त्यांचा पराभव झाला. त्यानंतर तृणमूल काँग्रेसने त्यांना राज्यसभेत पाठवले होते. याआधी कोणत्याही प्रकरणात त्यांचे नाव आले नाही. तसेच ते नेहमी शांत असतात. मात्र, आता त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाल्याने ते चर्चेत आले आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com