१ लाखांची पँट, ७० हजारांचा शर्ट, २० लाखांचे घड्याळ; समीर वानखेडेंच्या लाईफस्टाईलवर मलिकांचा नवा दावा

१ लाखांची पँट, ७० हजारांचा शर्ट, २० लाखांचे घड्याळ; समीर वानखेडेंच्या लाईफस्टाईलवर मलिकांचा नवा दावा

मुंबई | Mumbai

समीर वानखेडे (sameer wankhede) यांच्याबाबत नवाब मलिक (nawab malik) यांनी आज नवा खुलासा केला आहे. वानखेडे यांनी ncb त आल्यापासून स्वतःची प्रायव्हेट आर्मी उभी केली असून या आर्मीच्या माध्यमातून कोट्यवधींची वसूली केली जात असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. वानखेडे यांच्या लाईफस्टाईलवरही मलिक यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

नवाब मलिक म्हणाले ,की समीर वानखेडे मुंबईत (mumbai) आल्यानंतर प्राव्हेट आर्मी उभी केली. या आर्मीनं कोट्यवधींची वसूली केली आहे. समीर वानखेडे यांनी मालदीवमध्ये कोट्य़वधी रुपायांची वसूली केली आहे. समीर वानखेडे एक लाख रुपायांची पँट घालतात. सत्तर हजार रुपयांचा शर्ट घालतात. दोन लाख रुपयांचे बूट घालतात. त्यांच्या मनगटावर लाखो रुपयांचं घड्याळ आहे. एखाद्या इमानदार आधिकाऱ्यांकडे इतके पैसे आले कुठून? असा सवाल अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी उपस्थित केला आहे.

पुढे त्यांनी म्हटलंय की, जेएनपिटीवर अफीम असलेली एक बोट १५ दिवसापासून उभी आहे, मात्र अजून का गुन्हा दाखल करण्यात आलेला नाहीये? असा सवाल त्यांनी केला आहे. नवाब मलिक यांनी दावा केला आहे की, आर्यन खान केसमध्ये 18 करोडचा सौदा झाला होता. सॅम डिसोझा आता समोर आला आहे, त्याने काल तसे कबूल केले आहे की असा सौदा झाला आहे. हा सर्व फर्जीवाडा समीर वानखेडे करत होता. चित्रपटातील काही कलाकारांना गेल्यावेळी असेच चौकशीसाठी बोलावले होते. यामध्ये सारा अली खान, दीपिकाला चौकशीसाठी बोलावले होते. यातून पैसे उकळले जातात, असा दावा त्यांनी केला आहे.

देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर

गेल्या २६ दिवसात दोन महिलांची फक्त नाव घेतली कारण त्या विषयाशी संबंधित होत्या. पण महिला मुद्द्याला घेऊन काही लोक मला प्रश्न विचारत आहेत. पण किरीट सोमय्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या पत्नीचे नाव घेतात,संजय राऊत यांच्या पत्नीचे नाव घेतात,खडसे यांच्या पत्नीचा उल्लेख करतात मग या महिला नाहीत का? की यांच्या महिला फक्त महिला, असा सवाल राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांना विचारला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com