
मुंबई | Mumbai
ओबीसी राजकीय आरक्षणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) बांठिया आयोगाचा अहवाल मान्य केला आहे. या अहवालानुसार निवडणुका घेण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाला (State Election Commission) सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत...
आता ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला असताना त्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. आता भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
त्या म्हणाल्या की, मविआ सरकारने (MVA Government) केवळ वेळकाढूपणा केला. आता त्यांचे नेते ओबीसी आरक्षणाचे (OBC Reservation) श्रेय घेत आहेत. तरी जनता हुशार आहे आणि हे आरक्षण (Reservation) नेमके कोणामुळे मिळाले हे जनतेला माहिती आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
आयोगाने काही जिल्ह्यांमध्ये ओबीसींचे प्रमाण कमी दाखवले आहे. ते त्यापेक्षा जास्त असेल असा आम्हाला विश्वास आहे. हे तांत्रिक विषय हाताळणे आवश्यक आहे. ओबीसींचे हित जपणारे सरकार आल्याने त्या पायगुणाने आरक्षण मिळाले.
हा विषय श्रेयवादाच्या पलिकडे जाऊन हाताळला पाहिजे. आमच्या मागच्या वेळच्या सरकारने आरक्षण टिकवले होते. मात्र मविआ सरकारला ते टिकवता आले नाही. त्यांनी काम करण्याची मोकळिक दिली नाही. वेळकाढूपणा केला. मविआच्या नेत्यांनी आता हे सत्य स्वीकारले पाहिजे, असा टोला त्यांनी लगावला.