Shivshakti Parikrama : गळ्यात रुद्राक्षाची माळ, हातात त्रिशूळ...; पंकजा मुंडे बनल्या भोलेभक्त

Shivshakti Parikrama : गळ्यात रुद्राक्षाची माळ, हातात त्रिशूळ...; पंकजा मुंडे बनल्या भोलेभक्त

त्र्यंबकेश्वर | Trimbakeshwar

भाजपच्या राष्ट्रीय सचिव व माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी ४ सप्टेंबर ते ११ सप्टेंबर या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रभर शिवशक्ती परिक्रमा (Shivshakti Parikrama) यात्रा सुरू केली असून या परिक्रमेदरम्यान त्या महाराष्ट्रातील (Maharashtra) ज्योतिर्लिंग आणि महत्त्वाच्या धार्मिक स्थळांचे दर्शन घेत आहेत. त्यांच्या शिवशक्ती परिक्रमा यात्रेचा आजचा दुसरा दिवस असून त्यांनी आज सकाळी त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) येथे येऊन त्र्यंबकराजाचे दर्शन घेतले...

पंकजा मुंडे या आज सकाळच्या सुमारास त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल झाल्या. त्यानंतर त्यांनी त्र्यंबकेश्वर मंदिरात (Trimbakeshwar Temple) जाऊन विधिवत पूजा करत अभिषेक करून दर्शन घेतले. यावेळी त्यांचे त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने स्वागत करण्यात आले. पंकजा मुंडे यांच्या गळ्यात रुद्राक्षाची माळ आणि हातात त्रिशूळ असणाऱ्या पेहरावाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. तसेच पंकजा मुंडे यांनी नागपूर (Napur) येथून त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी आलेल्या एका भाविकाच्या (Devotee) लहान मुलाला आपल्या कडेवर उचलून घेतल्याचे देखील पाहायला मिळाले.

Shivshakti Parikrama : गळ्यात रुद्राक्षाची माळ, हातात त्रिशूळ...; पंकजा मुंडे बनल्या भोलेभक्त
“तिघांच सरकार... एक सिनियर एक ज्युनियर... दोन बायका फजिती ऐका”; एकनाथ खडसेंचा हल्लाबोल

याप्रसंगी भाजपचे तालुकाध्यक्ष विष्णू दोबाडे, त्र्यंबकचे माजी नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, माजी उपनगराध्यक्ष स्वप्नील शेलार, विश्वस्त कैलास घुले, समाधान चोथे यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते. तसेच शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे (NCP) कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, ठाकरे गटाच्या शिवसेनेचे युवक तालुकाप्रमुख समाधान आहेर, माजी उपसरपंच योगेश आहेर यांनी देखील मुंडे यांचे स्वागत केले.

Shivshakti Parikrama : गळ्यात रुद्राक्षाची माळ, हातात त्रिशूळ...; पंकजा मुंडे बनल्या भोलेभक्त
World Cup मध्ये खेळाडूंच्या जर्सीवर इंडियाऐवजी ‘हे’ नाव असावं; वीरेंद्र सेहवागचं ट्विट चर्चेत

दरम्यान, पंकजा मुंडे यांच्या शिवशक्ती परिक्रमा यात्रेला ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असून जागोजागी त्यांचे कार्यकर्त्यांकडून (Activists) जेसीबीमधून फुलांची उधळण करत जंगी स्वागत करण्यात येत आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

Shivshakti Parikrama : गळ्यात रुद्राक्षाची माळ, हातात त्रिशूळ...; पंकजा मुंडे बनल्या भोलेभक्त
'इंडिया' शब्द बदलावर संभाजीराजेंनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले...
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com