Monday, April 29, 2024
HomeराजकीयOBC Reservation : अज्ञान आणि अहंकारामुळे ओबीसी राजकीय आरक्षण गेलं, पंकजा मुंडेंची...

OBC Reservation : अज्ञान आणि अहंकारामुळे ओबीसी राजकीय आरक्षण गेलं, पंकजा मुंडेंची टीका

मुंबई l Mumbai

ओबीसीना राजकीय आरक्षण देण्याच्या ( OBC Reservation Issue ) आघाडीवर ठाकरे सरकारला सर्वोच्च न्यायालयात मोठा धक्का बसला आहे. राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ओबीसींना राजकीय आरक्षण देण्यारा अध्यादेश काढला होता.

- Advertisement -

मात्र, न्यायालयाने अध्यादेश रद्द केला असून, ओबीसी प्रवर्गांसाठी असलेल्या जागांवर खुल्या प्रवर्गातून निवडणूक घेण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाने दिलेल्या या महत्वपूर्ण निकालानंतर भारतीय जनता पक्षाचे नेत्या पंकजा मुंडे यांनी राज्य सरकारवर सरकारवर संताप व्यक्त केला आहे.

जाणून घ्या; ‘इम्पिरिकल डेटा’ म्हणजे नेमकं काय?, OBC आरक्षणासाठी का आहे महत्वाचा?

राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी आरक्षणाशिवाय नामुष्की ओढावल्याची टीका भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केली आहे. इम्पिरिकल डेटा देण्याचं काम हे सर्वस्वी राज्य सरकारचं आहे, जो डेटा राज्य सरकार केंद्र सरकारकडे मागतंय, तो मागण्याची आवश्यकता नाही, इम्पिरिकल डेटा हा राज्य सरकारने राबवण्याची गोष्ट आहे. त्यामुळे आधीच हा डेटा गोळा केला असता तर आज ही वेळ आली नसती. त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाच्या हा निर्णय ऐकण्याची वेळ ओबीसी समाजावर आली आहे, ही खूप दुर्देवी गोष्ट आहे, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

‘ओबीसी आरक्षणासाठी जे करता येईल ते करावे. जोपर्यंत ओबीसी प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत निवडणुका घेऊ नयेत. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात निवडणुका घ्या, असे कुठेही म्हटलेले नाही. राज्य सरकारमधले मंत्री ओबीसीसाठी रस्त्यावर उतरू म्हणतात. मग त्यांना निवडणुका पुढे ढकलणे काहीच अशक्य नाही. ओबीसी आरक्षणाचा विषय माझ्यासाठी हा राजकारणाच्या पलीकडचा आहे,’ असेही पंकजा यावेळी म्हणाल्या.

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक; फडणवीस म्हणतात, वेळ अजूनही गेलेली नाही

तसेच, ‘सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने ओबीसींचे मोठे नुकसान झाले आहे. हे नुकसान कधीही भरून निघणार नाही. ओबीसी हा संताप न बोलता जरूर व्यक्त करतील. राज्य सरकारने या प्रश्नी तात्काळ अधिवेशन घ्यावे. ओबीसींचा इम्पिरिकल डाटा गोळा करण्यासाठी वेळ ठरवावी. त्यासाठी आवश्यक तो निधी द्यावा. आता तरी या प्रकरणात चालढकल करू नये,’ असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

Indian Navy Day : छत्रपती शिवाजी महाराजांना ‘फादर ऑफ इंडियन नेव्ही’ का म्हणतात?International Tea Day 2021 : आज दिवस ‘चहा’त्यांचा! जाणून घ्या चहाचा रंजक इतिहास…Photo : ‘ही’ आहेत देशातील TOP 10 सर्वात पॉवरफुल कपलKatrina and Vicky : विकी-कतरिनाच्या हळदीचे फोटो पाहिलेत का?

- Advertisment -

ताज्या बातम्या