Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्या"मी भाजपची पण भाजप माझी..."; पंकजा मुंडेंचे सूचक विधान

“मी भाजपची पण भाजप माझी…”; पंकजा मुंडेंचे सूचक विधान

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

दिल्लीत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्ताने राष्ट्रीय समाज पक्षाकडून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी पुन्हा एकदा नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरीदेखील (Nitin Gadkari) उपस्थित होते…

- Advertisement -

पंकजा मुंडे (Pankaja Munde) म्हणाल्या की. तुम्ही म्हणताय ताईची पार्टी ताईची पार्टी. माझी कुठली पार्टी? मी भाजपची (BJP) आहे. भाजप माझी थोडीच आहे. भाजप खूप मोठा पक्ष आहे. मी भाजपची होऊ शकते. पक्ष माझा होऊ शकत नाही. कारण तो मोठा पक्ष आहे, असे धक्कादायक विधान त्यांनी केले आहे.

सिन्नर तहसीलदारांच्या खुर्चीत बाळूमामा विराजमान होतात तेव्हा…

त्या पुढे म्हणाल्या की, मला भीती वाटत नाही. कशाचीच भीती वाटत नाही. भीती न वाटणे हे आमच्या रक्तातच आहे. कशाची चिंता नाही. काही नाही मिळाले तर मी ऊस तोडायला जाईल. महादेव जानकर जातील मेंढ्या वळायला. अजून काय आहे, असे सूचक विधान त्यांनी केले.

आम्हाला काही गमवायचेच नाही. आम्हाला आयुष्यात कोणत्याही गोष्टीची आस्था, अपेक्षा आणि लालसा नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

आजपासून होणार ‘हे’ मोठे बदल, सामान्यांच्या खिशाला लागणार कात्री

- Advertisment -

ताज्या बातम्या