
बीड | Beed
पंकजा मुंडे यांना धनंजय मुंडे यांनी पुन्हा एकदा धक्का दिला आहे. पांगरी ग्रामपंचायत धनंजय मुंडे यांच्या ताब्यात आली आहे. 11 सदस्यांपैकी 10 सदस्य आणि सरपंचाची बिनविरोध निवड झाली आहे...
सुशील वाल्मिक कराड हे सरपंच म्हणून बिनविरोध निवडून आले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीआधीच गुलाल लागल्यामुळे परळीमधील 80 ग्रामपंचायत निवडणुकीत धनंजय मुंडे वरचढ ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, गोपीनाथ मुंडे यांनी याआधी 2019 सालच्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा धक्कादायकरित्या पराभव केला होता. आता ग्रामपंचायत निवडणुकीतही धनंजय मुंडे यांनी त्यांच्याच बहिणीला आणखी एक धक्का दिला आहे.