Friday, April 26, 2024
Homeराजकीयपाचोरा तालुक्यात 12 ग्राम पंचायती बिनविरोध

पाचोरा तालुक्यात 12 ग्राम पंचायती बिनविरोध

पाचोरा – Pachora – प्रतिनिधी :

तालुक्यातील 96 ग्राम पंचायतीच्या निवडणूक प्रक्रियेत नामांकन दाखल करण्याच्या दि.23 ते 30 दरम्यान 2352 महिला-पुरुष उमेदवारांनी नामांकन दाखल केले होते.

- Advertisement -

दि 31च्या छाननित 30 अर्ज तांत्रिक बाबीमुळे अवैध झाले दि.4 जानेवारी च्या माघारीची दिवशी694 उमेदवारांनी माघार घेतली असून तालुक्यातील राजुरी बु,वेरुळी बु, खु,वरसाडे पर.बो, चिंचपुरे, वडगाव मुलाने,रामेश्वर तांडा,शहापुरा,सांगवी प्रा.बो,दिघी, सारोळा बु,खु, एकूण 12 ग्राम पंचायती बिनविरोध झाल्याची माहिती प्रशासना कडून मिळाली आहे.

माघारी नंतर ग्राम पंचायत निवडणुकीची नामांकन-छाननी आणि माघार प्रक्रिया पार पडली आहे. दि.15 जानेवारी रोजी होणार्‍या मतदानासाठी प्रांताधिकारी राजेंद्र कचरे व तहसीलदार कैलास चावडे यांच्या अखत्यारीत ग्रामीण भागात गाव पातळीवर 353 मतदान केंद्र, निवडणुकीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी 43 निवडणूक निर्णय अधिकारी, 390, शिपाई, 390 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. दि.18 जानेवारी रोजी सारोळा रोड वरील समर्थ लॉन्स येथे मतमोजणी होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या