Thursday, April 25, 2024
Homeराजकीय…तर आरोग्यमंत्री राजीनामा देतील का?

…तर आरोग्यमंत्री राजीनामा देतील का?

दिल्ली | Delhi

देशातील करोना परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत असताना नियंत्रणासाठी लसीकरण हा केवळ एकच मार्ग दिसत आहे. केंद्र सरकारने १ मेपासून १८ वर्षांपुढील सर्वांच्या लसीकरणाची परवानगी दिली आहे.

- Advertisement -

एकीकडे मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्यासाठी केंद्र सरकार आवाहन करत असताना दुसरीकडे अनेक राज्यांनी लसींचा तुटवडा असल्याची तक्रार केली आहे. ठाकरे सरकारनेही राज्यात १ मे पासून लसीकरण सुरु होणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. यादरम्यान काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी चिदंबरम यांनी केंद्र सरकार आणि आरोग्य मंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

पी चिदंबरम यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, ‘आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांची १ मे रोजी कसोटी असेल. राज्यांकडे लसींचा मुबलक साठा असल्याचा त्यांचा आणि त्यांच्या सरकारचा दावा हवेत उडून जाईल’. असे चिदंबरम यांनी म्हंटल आहे. तसेच, चिदंबरम यांनी यावेळी कोणतंही राज्य १८ ते ४४ वयोगटाच्या लसीकरणासाठी अद्याप तयार नसल्याचा दावा केला. इतकंच नाही तर CoWin अँपही सहकार्य करत नाही असंही ते म्हणाले आहेत. ‘जर लस नाही म्हणून १ मे नंतर लसीकरण केंद्रांवरुन लोकांना घरी पाठवण्यात आलं तर आरोग्यमंत्री राजीनामा देणार का?,’ असा सवाल चिदंबरम यांनी केला आहे.

दरम्यान, केंद्रीय आरोग्यमंत्री केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी देशातील करोनाच्या परिस्थितीवर माहिती देताना सांगितलं होतं की, ‘देशात ॲाक्सिजनचा आणि लसींचा पुरेसा साठा आहे. लोकांनी पॅनिक होऊ नये. प्रत्येक रुग्णाला ॲाक्सिजनची गरज नसते. हे फक्त आरोग्यमंत्री म्हणून सांगत नाही तर मी स्वत: एक डॉक्टर आहे.’

तसेच देशातील लसींच्या अपुऱ्या पुरवठ्यावर बोलताना डॉ. हर्ष वर्धन म्हणाले होते की, ‘राज्यांकडे अद्याप एक कोटी लसींचे डोस उपलब्ध आहेत. येत्या दोन-तीन दिवसात आणखी लसी देण्यात येतील.’ केंद्रीय आरोग्य मंत्र्यांच्या या वक्तव्यावर पी चिदंबरम यांनी टीका केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या