Friday, April 26, 2024
Homeराजकीयराज्यापुढे हात पसरवण्याची वेळ येऊ नये अशी मुख्यमंत्री आणि शरद पवारांची इच्छा...

राज्यापुढे हात पसरवण्याची वेळ येऊ नये अशी मुख्यमंत्री आणि शरद पवारांची इच्छा – राजेश टोपे

पुणे (प्रतिनिधि) – राज्यातील अनेक साखर कारखाने शरद पवारांच्या आवाहनानंतर ऑक्सिजन निर्मितीसाठी पुढे येत असून आपले राज्य आत्मनिर्भर व्हावे आणि स्वतःच्या पायावर उभे राहावे, तसेच इतर राज्यापुढे हात पसरवण्याची वेळ येऊ नये अशी मुख्यमंत्री आणि शरद पवारांची इच्छा असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिटयूट येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीआधी राजेश टोपेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

- Advertisement -

केंद्राच्या कायद्यात जोपर्यंत बदल होत नाही, तोपर्यंत आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागू शकत नाही. त्यांनी बदल करावा, आपण तो स्विकारण्यास तयार आहोत. मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे. पण ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता दिले पाहिजे. हीच अपेक्षा महाविकास आघाडी सरकारची असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच सिंधुदूर्ग, रायगड, कोल्हापूर आणि सातारा येथे पाच टक्क्यांपेक्षा जास्त दर आहे. त्या ठिकाणी आमचे लक्ष असून लवकरच तेथील परिस्थिती नियंत्रणात येईल, असा विश्वास राजेश टोपे यांनी व्यक्त केला आहे.

लसीचा पुरवठा करताना महाराष्ट्राला झुकते माप द्यावे

देशात कोरोनाचा सर्वात ज्यास्त फटका महाराष्ट्राला बसला आहे. देशाच्या दहा टक्के जनता महाराष्ट्रात आहे अशा स्थितीत केंद्राने लसीचा पुरवठा करताना महाराष्ट्राला झुकते माप दिले पाहिजे अशी अपेक्षा राजेश टोपे यांनी यावेळी व्यक्त केली.

ते म्हणाले, राज्यातील कोरोनाची परिस्थिती संपूर्णपणे आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले जात असून दोन तीन जिल्हे सोडले तर पॉझिटिव्ह रेट कमी होत आहे. आपण स्वतः राज्यात फिरतो आहोत आणि ही परिस्थिती नियंत्रणात येईल असे टोपे म्हणाले.

लसीकरणाबाबत बोलताना टोपे म्हणाले, राज्याला लसीचे झुकते माफ मिळावे अशी अपेक्षा व्यक्त करत राहायची. दिवसाला दहा लाख लसीकरण करण्याची राज्याची क्षमता आहे, आता 21 तारखेपासून लसीकरण केंद्र सुरू करणार आहे. राज्यात ही मोहीम जलद करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे टोपे म्हणाले. देशात कोरोनाचा सर्वात ज्यास्त फटका महाराष्ट्राला बसला तसेच देशाच्या दहा टक्के जनता महाराष्ट्रात आहे अशा स्थितीत केंद्राने लसीचा पुरवठा करताना महाराष्ट्राला झुकते माप दिले पाहिजे असे टोपे म्हणाले,.

राज्यात आता पर्यत अडीच ते 3 कोटी लसीचे डोस देण्यात आले आहेत. आणखी 13 डोस महाराष्ट्राला आवश्यक आहेत, हे सर्व काम पुढच्या 4 ते 5 महिन्यात संपवायचे आहे त्यासाठी केंद्राच्या सहकार्याची गरज आहे असे राजेश टोपे म्हणाले. म्युकर म्युकोसिस बाबत बोलताना, रुग्णांनी सरकारी रुग्णालयातच उपचार घ्यावे, तिथं सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत तसेच यावर आवश्यक इंजेक्शन मिळवण्याचा प्रयत्न करत आहे, खासगी रुग्णलयात उपचार घ्यायचे असतील तर तिथे सुद्धा राज्य सरकारने कॅपिंग केलेली आहे. त्याठिकाणी आवश्यकते पेक्षा जास्त पैसे देऊ नये, तसेच कुठल्याही खासगी हॉस्पिटलने तसं करू नये असे टोपे म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या