Tuesday, April 23, 2024
Homeराजकीयभाजपाची प्रतिमा मलिन करण्यासाठी कृषी विधेयकाला विरोध

भाजपाची प्रतिमा मलिन करण्यासाठी कृषी विधेयकाला विरोध

पुणे(प्रतिनिधी)

मोदी सरकारच्या कृषी विधेयकांमुळे छोट्या शेतकऱ्यांचे कल्याण होणार आहे. मात्र, केंद्राने मान्य केलेल्या दोन बिलांना विरोधक विरोढ करत आहेत. सहा वर्षांपासून काँग्रेस व मित्र पक्षानं लोकांसमोर जाण्यासाठी कुठलाही मुद्दा नाही. सर्वच क्षेत्रात मोदी सरकारचे भरीव काम झाले आहे. त्यामुळे केवळ भाजपाची प्रतिमा मालिन करण्यासाठी कृषी विधेयकाविरुध्द हे आंदोलन सुरू असल्याचा आरोप केंद्रीय अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत केला. दरम्यान, केंद्र सरकार शेतकऱ्यांकडून किमान आधारभूत किमतीने शेतीमाल खरेदी करणार आहेत आणि बाजार समित्या बंद केल्या जाणार नाहीत असे त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

ते म्हणाले, केंद्र सरकार शेतकऱ्यांकडून किमान आधारभूत किमतीने शेतीमाल खरेदी करणार आहेत आणि बाजार समित्या बंद केल्या जाणार नाहीत हे पंतप्रधान आणि केंद्रीय कृषी मंत्र्यांनी दोन्ही सभागृहात स्पष्ट केले आहेत. परंतु , विरोधक शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहे. कृषी विधेयकाद्वारे शेतकऱ्याला मुक्त केले आहे. पूर्वी केवळ बाजा समितीचा परवाना असलेलाच व्यापारी माल खरेदी करू शकत होते. आता पॅनकार्ड असलेली देशातील कोणतीही व्यक्ती हा माल खरेदी करू शकेल.

प्रत्येक बाजार समितीकडून शेतकऱ्यांकडून टॅक्स, सेस गोळा केला जातो. आता व्यापारी शेतकऱ्याच्या शेतात जाईल. खासगी व्यापारी नगदी देणार असल्याने शेतकऱ्यांना इकडे काटा आणि तिकडे नोटा अशी परिस्थिती असेल.मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी एक लाख कोटीची तरतूद केली. या दोन्ही कृषी विधेयाकांमुळे शेती क्षेत्रात उर्जित अवस्था येईल. माल खराब व्हायचे प्रणाम कमी होणार आहे असे ते म्हणाले.

शेतकऱ्यांचे उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करण्याचे आश्वासन देण्याचे आश्वासन दिले आहे, त्यादिशेने ही पावले आहेत. राष्ट्रीय किसान मंच यांनी या विधेयकाला विरोध केला आहे त्याबाबत बोलताना यांची मत वेगळी असू शकतात, त्यांना त्यांचे मत मांडण्याचा अधिकार आहे असे ते म्हणाले.

अकाली दल हा आमचा जुना मित्र आहे. परंतु सध्या पंजाबच्या निवडणुका आहेत. तेथे कॉंग्रेसने आम्ही विजयी झालो तर शेतकऱ्यांना बाजार समितीमुक्त करू असे आश्वासन दिले आहे. अकाली दलाला तिथे निवडणूक जिंकायची आहे. केंद्रात एक भूमिका आणि राज्यात एक भूमिका घेणे त्यांना शक्य नाही. त्यामुळे राज्यात सरकार आणण्यासाठी त्यांचा हा प्रयोग आहे असे दानवे म्हणाले.

कृषी विधेयाकांमुळे शेतकर्यांना फायदा होणार असेल तर तुम्हाला एवढे स्प्ष्टीकरण का कारावे लागते, असे विचारल्यावर आम्हाला विरोधकांची भीती वाटत नाही. परंतु, ते अपप्रचार करत असतील तर त्याचे निरसन करणे आमचे काम आहे असे ते म्हणाले.

सुशांतसिंह प्रकरणाने भाजपची प्रतिमा मलीन होणार नाही

सुशांतसिंह मृत्यू प्रकरणात भाजपच्या हस्तक्षेपामुळे देशात आणि जगात भाजपची प्रतिमा मलीन झाली आहे, याबाबत बोलताना दानवे म्हणाले, सुशांतसिंह प्रकरणामुले भाजपची प्रतिमा मलीन झालेली नाही. तसेच कोरोनावर नियंत्रण मिळवल्यामुळे जगात पंतप्रधान मोदींचे कौतुक होत आहे असे ते म्हणाले. तर राज्यातील महाविकास आघाडी सरकार आम्ही सरकार पाडणार नाही. हे अमर, अकबर अँथनीचे सरकार आहे. ते एकमेकांच्या पायात पाय अडकून पडेल याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

हाथरस येथील घटनेबद्दल बोलताना ते म्हणाले, जी घटना घडली त्याचे समर्थन कोणीच करणार नाही. परंतु, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नेमली होती. त्यांची चौकशी सुरु असल्याने सुरुवातील तिथे कोणाला जावू दिले नाही. ती चौकशी तत्काळ होणे आवश्यक होते. त्यानंतर सर्वजण गेले असे त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या