विरोधी पक्षनेते फडणवीस खोटी माहिती देत आहेत!

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा आरोप
विरोधी पक्षनेते फडणवीस खोटी माहिती देत आहेत!

मुंबई । प्रतिनिधी

महाराष्ट्रात कोरोना विरोधात सुरू असलेल्या उपाययोजनांची नोंद जगभरातील लोक घेत आहे. मुंबई महापालिकेच्या कामाची मुंबई मॉडेल म्हणून चर्चा होत आहे. ही चर्चा सहन होत नसल्याने विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून महाराष्ट्राबद्दल खोटी माहिती पसरवण्याचे काम करत आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी रविवारी केला.

फडणवीस यांनी काल सोनिया गांधींना पत्र लिहून महाराष्ट्रात कोरोनाचे मृत्यू लपवले जात असल्याचा आणि ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर आज पत्रकारांशी बोलताना मलिक यांनी कोरोनाच्या बाबतीत राज्य सरकार गंभीरपणे काम करत असल्याचे सांगितले. न्यायालयापासून नीती आयोगापर्यंत सर्वांनी सरकारच्या कामाची प्रशंसा केली आहे. हे कौतुक फडणवीस यांना सहन होत नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

कोरोना पॉझिटिव्हचा आकडा किंवा मृतांचा आकडा सरकार लपवत नाही. राज्यात ६ हजार २०० लॅब तयार करण्यात आल्या आहेत. जास्तीत जास्त आरटीपीसीआरच्या टेस्ट करण्यात आल्या. ही सर्व माहिती उघडपणे जनतेसमोर ठेवल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.

गुजरातमध्ये ७१ दिवसात ६१ हजार कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण लपविण्यात आले. गोव्यात ऑक्सिजन मिळत नसल्याने रोज लोकांचा मृत्यू होत आहे. उत्तर प्रदेशमध्ये २ हजार लोकांचे मृतदेह नदीमध्ये फेकण्यात आल्याची बातमी आहे. याचा अर्थ जिथे दुहेरी इंजिनचे सरकार आहे तिथे ते अपयशी ठरत आहेत, अशी टीका मलिक यांनी केली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com