Monday, April 29, 2024
Homeराजकीयविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस करोनामुक्त

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस करोनामुक्त

मुंबई | Mumbai

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी करोनावर मात केली आहे. सेंट जॉर्ज रुग्णालयातून त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे. रुग्णालयाच्या बाहेर येताच देवेंद्र फडणवीस यांनी हात जोडून सगळ्यांना अभिवादनही केलं.

- Advertisement -

सेंट जॉर्ज रुग्णालयाचे सुप्रीटेंडंट डॉ. आकाश खोब्रागडे यांनी देवेंद्र फडणवीस यांना पुढचे १० दिवस होम क्वारंटाइन राहण्याचा सल्ला दिला आहे. देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या सागर या शासकीय बंगल्यावर होम क्वारंटाइन असणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांना शुगरचा त्रास असल्याने त्यांची थोडी अधिक काळजी घ्यावी लागत होती. देवेंद्र फडवीस यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळीही ९३ पर्यंत खाली आली होती. त्यामुळे मागील आठवड्यात त्यांना रेमडेसिव्हिर इंजेक्शन देण्यात आले. त्यानंतर त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी ९७ पर्यंत वाढली. गेल्या रविवारी आणि सोमवारी देवेंद्र फडणवीस यांना प्लाझ्मा थेरपीचे डोसही देण्यात आले होते असंही डॉ. खोब्रागडे यांनी सांगितलं.

देवेंद्र फडणवीस यांना 24 ऑक्टोबरला त्यांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर त्यांनी रुग्णालयात भरती होण्याचा निर्णय घेतला होता. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आलेला प्रत्येक दिवस हा कार्यरत राहण्यात गेला. पण आता काही काळ विश्रांती घेतली पाहिजे, अशी परमेश्वराची इच्छा असावी. माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली असून मी स्वतःला आयसोलेट केले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेतो आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःची चाचणी करून घ्यावी. सर्वांनी स्वतःची काळजी घ्यावी! असे आवाहन फडणवीस यांनी केले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या