पुण्यातील जम्बो कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी एकाला अटक, किरीट सोमय्यांची माहिती

पुणे | Pune

करोना (Coronavirus) महामारी काळात पुणे येथील शिवाजीनगर जम्बो कोविड सेंटर (Shivajinagar Jumbo Covid Center Scam) कथीत घोटाळा प्रकरणी एका व्यक्ती अटक झाल्याचे समजते. राजीव साळुंखे (Sanjeev Salunkhe) असे या व्यक्तीचे नाव आहे.

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी साळुंखे यांना अटक झाल्याचा दावा ट्विटरवर केला आहे. मात्र साळुंखे यांना अटक झाल्यााबत अधिकृत माहिती मात्र मिळू शकली नाही. राजीव साळुंके हे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाचे खासदार संजय राऊत आणि सुजित पाटकर यांचे व्यावसायिक भागिदार असल्याचे बोलले जात आहे.

किरीट सोमय्या यांनी ट्विट करुन म्हटले आहे की, लाइफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस मुंबईच्या राजू साळुंखे पार्टनरला पोलिसांनी अटक केली. या घोटाळ्यामुळे ३ कोविड रुग्णांचा मृत्यू झाला होता. आणि सुजित पाटकर, हेमंत गुप्ता, संजय शाह, हे फरार आहेत. उद्धव ठाकरे यांनी या बोगस कंपनीला कंत्राट दिले होते. असे किरीट सोमय्या यांनी ट्विट करुन म्हटले आहे.

सोमय्यांचा आरोप काय?

राजीव साळुंखे (Rajiv Salunkhe) हे सुजीत पाटकर यांच्या कंपनीत पार्टनर आहेत. आणि पाटकर हे शिवसेना नेते संजय राऊत यांचे निकटवर्तीय असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांच्याकडून करण्यात आला होता. साळुंखे यांचं परळला केईएम हॉस्पिटलसमोर त्यांचं सह्याद्री रिफ्रेशमेंट नावाचं हॉटेल आहे. साळुंखे यांना पुण्यातील 100 कोटींचं जम्बो कोव्हिड सेंटर दिलं गेलं आहे. हॉटेलचं केवळ एक लाख रुपये इन्कम टॅक्स रिटर्न भरणाऱ्या साळुंखेंना 100 कोटींचं कंत्राट कसं मिळालं? असा सवाल सोमय्या यांनी केला होता.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *