
मुंबई :
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना आणखी एक ऑफर मिळाली आहे. या ऑफरमध्ये सरकारच सत्तेवर आणण्याचे आश्वसन आहे.
केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री आणि आरपीआय प्रमुख रामदास आठवले यांनी एकनाथ खडसे यांना ऑफर दिली आहे. एकनाथ खडसे यांनी आरपीआयमध्ये यावे, आपण आपले सरकार आणू या, असे ते म्हणाले. खडसे राष्ट्रवादीत जाणार नाहीत. त्यांना जायचे असते तर आधी जायला हवे होत. तेव्हा गेले असते तर आता मंत्री झाले असते. पण राष्ट्रवादीत आता सगळे फुल्ल असल्याचे आठवले म्हणाले.
चैत्यभूमीचं ऑनलाईन दर्शन
६ डिसेंबर निमित्त सह्याद्री गेस्ट हाऊस वर बैठक झालेल्या बैठकीनंतर ते बोलत होते. करोना असल्याने ६ डिसेंबरला लोकांनी येऊ नये. सगळे सण घरातच साजरा करायचे आवाहन आठवलेंनी केले. चैत्यभूमीचं ऑनलाईन दर्शन घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले.
दादरमध्ये अनेक कोरोनाग्रस्त रुग्ण सापडत असल्याने अनुयायांनी बाहेरुन मुंबईला येणे धोक्याचे आहे. त्याऐवजी ऑनलाईन दर्शनाची सोय करावी, असे अधिकाऱ्यांना सांगितल्याचे आठवले म्हणाले. दसरा, नवरात्रीबाबत जशी नियमावली तयार केली आहे, तशीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त नियमावली बनवावी. ज्या ज्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे आहेत तिथे हार घालावा, असे आवाहन रामदास आठवले यांनी केले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार चांगले मित्र आहेत. मी जी भूमिका मांडतो, ती गांभीर्यांने घेतात. त्यामुळे पवार साहेबांना मी काही उत्तर देणार नाही. कोणाला माझी भूमिका आवडत असेल नसेल, असे आठवले म्हणाले.