“सूर्य एखाद्या वेळी पश्चिमेकडे उगवेल, पण बारामती...”; भाजपच्या टीकेला जयंत पाटलांचं प्रत्युत्तर

“सूर्य एखाद्या वेळी पश्चिमेकडे उगवेल, पण बारामती...”; भाजपच्या टीकेला जयंत पाटलांचं प्रत्युत्तर

मुंबई | Mumbai

काल बारामतीच्या (Baramati) दौऱ्यावर असताना भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad pawar) यांना टार्गेट केलं. तर, कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी 'आजवर अनेक गड उध्वस्त झालेत' असं म्हणत पवारांचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीमध्ये सत्तापालट होणारच असा दावा केला.

भाजपच्या या खटाटोपाची राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी खिल्ली उडवली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत जयंत पाटील यांनी भाजप आणि भाजप नेत्यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आहे. एखाद्याचा अश्वमेध रोखल्यावर जो त्रास होतो, तो त्रास शरद पवार साहेबांच्या बारामतीत भाजपला होतोय, असं पाटील यांनी म्हटलं आहे.

'बारामतीमधील जनता कशी आहे याची आम्हाला पूर्ण माहिती आहे. त्यामुळं कुणीही बारामतीत आलं तरी एक लाखापेक्षा जास्त मताधिक्य सुप्रियाताई सुळे आणि अजित पवार यांना मिळतेच. बारामतीत सूर्य एखाद्या वेळी पश्चिमेकडे उगवेल, परंतु बारामती पवारसाहेबांना सोडणार नाही एवढं ते घट्ट नातं आहे, असा दावा जयंत पाटील यांनी केला.

भाजपचं मिशन बारामती काय आहे?

शरद पवारांचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या बारामती मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी भाजपनं रणनीती आखली आहे. भाजपनं बारामती पिंजून काढण्यास सुरूवात केली. या मतदारसंघाचा दौरा लवकरच अर्थमंत्री निर्मला सीतारामन या बारामती दौऱ्यावर येणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने त्यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com